spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Big Boss 16: ‘हरयाणाची शकीरा’ गौरी नागोरी बिग बॉसमध्ये प्रवेश करणार? प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

गौरी कधीही शोमध्ये प्रवेश करू शकते, तथापि, अद्याप गौरी नागोरीकडून याविषयी कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

टीव्हीचा सर्वात मोठा वादग्रस्त शो ‘बिग बॉस १६’ १ ऑक्टोबरला नव्या सीझनसह धमाकेदार पुनरागमन करणार आहे. या शोसाठी सलमान खाननेही कंबर कसली आहे. दररोज निर्माते शोशी संबंधित प्रोमो व्हिडिओ चाहत्यांसह शेअर करत आहेत. सलमान खान कधी ‘रॉकी भाई’ तर कधी ‘गब्बर सिंग’ बनून प्रोमोजद्वारे चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसतो. यासोबतच लोक या शोबद्दल खूप उत्सुकता दाखवत आहेत. नव्या सीझनसोबत तो शोमध्ये काय होणार याचीही माहिती देताना दिसत आहे.

जेव्हापासून ‘बिग बॉस १६’च्या आगमनाची चर्चा सुरू झाली आहे, तेव्हापासून या शोमध्ये येणार्‍या स्पर्धकांची चर्चा सुरू आहे. एकामागून एक स्पर्धकांची नावे समोर येत आहेत. ताना दत्ता, सुंबुल तौकीर, गौतम विग, शालीन भानोत आणि निम्रत कौर अहलुवालिया हे आतापर्यंत निश्चित झालेले स्पर्धक आहेत. आता या यादीत आणखी एका नावाची भर पडली आहे. हरियाणाची शकीरा गौरी नागोरी या शोचा एक भाग असणार असल्याचे बोलले जात आहे.

गौरी कधीही शोमध्ये प्रवेश करू शकते, तथापि, अद्याप गौरी नागोरीकडून याविषयी कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. गौरी नागोरी या वादग्रस्त शोमध्ये येण्याबद्दल सूत्राने सांगितले की, “जेव्हा सपना चौधरी या शोचा एक भाग होती, तेव्हा तिने मनोरंजनासोबतच तिच्या नृत्यकौशल्याने प्रेक्षकांना भुरळ घातली होती. निर्मात्यांनी योजना आखली होती की ते सपनासारखीच कुणीतरी व्यक्ती पुन्हा शोमध्ये आणणार आहेत. निर्मात्यांच्या म्हणण्यानुसार गौरी सपनाप्रमाणेच प्रेक्षकांचे मनोरंजन करू शकते. गौरी सोशल मीडियावर चांगलीच लोकप्रिय आहे. तिच्या नृत्यकौशल्याने गौरीने अनेकांना वेड लावले आहे.

कोण आहे गौरी नागोरी?

गौरी नागोरी ही एक नृत्यांगना आहे जी मूळची राजस्थानमधील नागौरची आहे, परंतु ती जवळजवळ संपूर्ण उत्तर भारतात ‘हरियाणाची शकीरा’ म्हणून ओळखली जाते. गौरीचे खरे नाव तस्लिमा बानो आहे. स्टेज परफॉर्मन्सदरम्यान गौरी अनेकदा वादात सापडली आहे. तिच्या बोल्ड मूव्ह्समुळे गौरीला अनेकदा लोकांचे टोमणे ऐकावे लागतात. नुकतीच गौरी पुन्हा एकदा वादात सापडली होती जेव्हा तिच्यावर महाशिवरात्रीच्या एका कार्यक्रमात अश्लिल डान्स केल्याचा आरोप झाला होता. ट्रोलच्या निशाण्याखाली आलेल्या गौरीने युजर्सवर तोंडसुख घेतले आणि सडेतोड उत्तरही दिले. गौरी म्हणाली की ती भगवान शंकराच्या नटराज रूपाची पूजा करत होती, तो अश्लील कसा असू शकतो?

हॉलिवूड अभिनेत्री आणि नृत्यांगना शकीराला आपला आदर्श मानणारी गौरी पहिल्यांदा नाचली, तेव्हा तिच्या पालकांनी तिला १२ दिवस तिला खोलीत कोंडून ठेवले होते. तिच्या या निर्णयावर गौरीचे आई-वडील खूप संतापले होते, पण नंतर गौरीच्या कलेची मागणी पाहता त्यांनी आपला निर्णय बदलला. आजच्या तारखेत गौरी ही सपना चौधरीपेक्षाही प्रसिद्ध मानली जाते. गौरीने स्वतः सपना चौधरीच्या डान्स शोमध्येही काम केले आहे.

हे ही वाचा:

Boycott Vikram Vedha: ‘ मुलाचे नाव राम ठेवू शकत नाही…’ सैफ अली खानचा हा व्हिडिओ पाहून नेटकरी संतापले!

अभिनेत्री जॅकलिनला दिल्ली कोर्टाकडून दिलासा, सुकेश चंद्रशेखर आणि जॅकलिनचे काय संबंध होते?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss