spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Pankaja Munde : पंकजा मुंडेंच्या मोदीं विरोधात वक्तव्यानंतर, चक्क राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली पाठराखण

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलेल्या वक्तव्यावर चक्क राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याने यांची पाठराखण केली आहे. मी पक्षाशी प्रामाणिक असेल तर मोदीजीही मला पराभूत करू शकणार नाहीत, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं. यावर राष्ट्रवादी काँग्रेस नेते एकनाथ खडसे यांनी पंकजा यांची भावना अधिक स्पष्ट करून सांगितली. ते म्हणाले, ‘ अनेक वर्ष मी प्रामाणिकपणे केलं असेल तर मला कुणीही पराभूत करू शकणार नाही, अशी त्यांची भावना असेल. कदाचित मोदींचं नाव त्यांनी कोणत्या अर्थाने घेतलं, हे मला सांगता येत नाही. मोदींना आव्हान दिलं असेल तर ते दुर्दैवी आहे. मोदींना आव्हान दिलं नसेल. त्याचा अर्थ तसा घेतलाही जाऊ नये, अशी प्रतिक्रिया पूर्वीचे भाजपाचे नेते आणि आता राष्ट्रवादीत असलेले एकनाथ खडसे यांनी केलंय.

हेही वाचा : 

भारतात PFI संघटनेवर बंदी, मोदी सरकारचा मोठा निर्णय

पंकजांनी अनेकवेळा वरिष्ठांवर नाराजी व्यक्त केली तरी त्या प्रामाणिकपणे आपलं काम करतायत, असं वक्तव्य खडसे यांनी केलं. पंकजांच्या वक्तव्याची पाठराखण एकनाथ खडसेंनी कशी केली, यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहेत.

पंकजा मुंडे नेमके काय म्हणाल्या ?

सध्या राज्यात ग्रामंपचायत आणि इतर निवडणुका सुरु होत आहेत. आता या निवडणुका आपण वेगळ्या पद्धतीनं लढूया, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. आपल्याला जात, पात, पैसा, प्रभाव याच्या पलीकडे जाऊन विचार करायचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वंशवादाचं राजकारण संपवायचं आहे. मी सुद्धा वंशवादाचं प्रतीक आहे मात्र मला कोणी संपवू शकत नाही, मोदीजींनी सुद्धा ठरवून मला संपवायचा प्रयत्न केला तर ते सुद्धा मला संपवू शकत नाहीत. जर मी तुमच्या मनावर राज्य केले तर ते तसं करु शकणार नाहीत, असं पंकजा मुंडे यांनी बोलताना म्हणाल्या.

चेहरा गोरा पण मान काळपट तर करा हे उपाय

धनंजय मुंडे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका

राजकारणात आपल्याला स्वच्छता आणायची आहे. राजकारणात आपल्याला बदल करावे लागतील. राजकारणी करमणुकीचं साधन व्हायला लागले. राजकारणी तर गणेश मंडळ करा, नवरात्री करा, गरबा करा,नाटक बोलवा, तमाशा बोलवा काय चाललंय हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अभिप्रेत नाही. आपण जुन्या पद्धतीच्या राजकारणाप्रमाणं काम करु, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. माजी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर पंकजा मुंडे यांनी अप्रत्यक्षपणे टीका केल्याचं बोललं जात आहे.

सतत उचक्या का लागतात ? उचक्या थांबविण्यासाठी काही उपाय

Latest Posts

Don't Miss