spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Tata Tiago EV : कार खरेदी करण्याचा विचार करताय?, टाटानं लॉन्च केली देशातील स्वस्त इलेक्ट्रिक कार

सणासुदीचा काळ सुरू झाला आहे आणि या काळात ऑटोमोबाईल मार्केटमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. या उत्साहात अधिक आंदण देण्यासाठी , टाटा मोटर्सने आज इलेक्ट्रिक कारच्या सेगमेंटमध्ये आणखी एक मॉडेल लाँच केले आहे. ही नवी कार Tata Tiago EV आहे. ही देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार आहे. ही कार तुम्ही फक्त ८.४९ लाख रुपयांना खरेदी करू शकता. यासाठी तुम्ही ते १० ऑक्टोबरपासून बुक करू शकाल आणि त्याची डिलिव्हरी जानेवारी २०२३ पासून सुरू होईल.

‘मी माझ्या मुलाचे नाव राम ठेवू शकत नाही..’ सैफ अली खानचा या वक्तव्यानंतर करीन सोशल मीडिया ट्रोल

जाणून घ्या कारचे फीचर्स

पेट्रोल आवृत्तीच्या तुलनेत टिगोर ईव्हीच्या आतील भागात किरकोळ बदल करण्यात आले आहेत. याचा डॅशबोर्ड ड्युअल कलरमध्ये सादर करण्यात आला आहे. यासोबतच प्रीमियम लेदर सीट कव्हर्स, हरमनची इन्फोटेनमेंट सिस्टम, अधिक उत्कृष्ट सीट कुशन देण्यात आले आहेत. या कारचा बेसिक प्लॅटफॉर्म पूर्वीसारखाच आहे.

हेही वाचा : 

Lata Mangeshkar : लता दीदींच्या जयंतीच्या दिवशी मोदींनी दिली अनोखी भेट

रेंज किती आहे?

या इलेक्ट्रिक कारमधील इलेक्ट्रिक मोटर ७४ bhp पॉवर आणि १७० Nm टॉर्क जनरेट करते जी २६kWh बॅटरी पॅकसह जोडलेली आहे. ही इलेक्ट्रिक कार एका चार्जमध्ये ३१० किमीपर्यंतची रेंज देण्यास सक्षम आहे. यासोबतच यामध्ये फास्ट चार्जरचाही सपोर्ट देण्यात आला आहे, ज्याच्या मदतीने ते केवळ १ तासात ० ते ८० टक्के चार्ज होऊ शकते.

वैशिष्ट्ये

Tata Tiago EV ला Z Connect सह स्मार्टवॉच कनेक्टिव्हिटी, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, मल्टिपल ड्राइव्ह मोड्स, फॉग लॅम्प्स, मल्टी-मोड रीजन फंक्शन, फ्लॅट-बॉटम स्टीयरिंग व्हील, क्रूझ कंट्रोल, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम यांसारखी वैशिष्ट्ये मिळतात.

संतोष बांगर समर्थकाने शिवीगाळ केल्यानंतर महिला पदाधिकाऱ्याची पक्ष प्रमुखांना तक्रार

किंमत किती आहे?

Tata Tiago EV ही भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार आहे. कंपनीने या नवीन इलेक्ट्रिक कारची एक्स-शोरूम किंमत ८.४९ लाख रुपये ठेवली आहे. Tata Tiago EV ही सेगमेंटमधील पहिली इलेक्ट्रिक कार आहे. टाटा टियागो ही ईव्ही हॅचबॅक सेगमेंटमधील देशातील पहिली इलेक्ट्रिक कार आहे, ज्यामुळे बाजारात अद्याप फारशी स्पर्धा नाही. पण येत्या काळात या सेगमेंटमध्ये इतर इलेक्ट्रिक कार लॉन्च केल्या जाऊ शकतात.

Deepika Padukone : बॉलीवूड स्टार दीपिका पदुकोण लढते ‘या’ गंभीर आजाराशी

Latest Posts

Don't Miss