spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पाकिस्तानच्या घोषणा देणाऱ्यांवर कठोर करावाई … – एकनाथ शिंदे

पीएफआयसारख्या (PFI) देश विघातक संघटना आहेत, त्यांचा चोख बंदोबस्त केला पाहिजे. पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांना देशात राहण्याचा अधिकार असून पीएफआय संघटेनवर बंदी (Bann PFI) घातली ती योग्य असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM eknath Shinde) यांनी व्यक्त केलं आहे.

पीएफआयसारख्या (PFI) देश विघातक संघटना आहेत, त्यांचा चोख बंदोबस्त केला पाहिजे. पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांना देशात राहण्याचा अधिकार असून पीएफआय संघटेनवर बंदी (Bann PFI) घातली ती योग्य असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM eknath Shinde) यांनी व्यक्त केलं आहे. शिवाय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी केलेल्या निर्णयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले आहे.

मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) आणि इतर काही संघटनांवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. पीएफआय संघटनेवर दहशतवादी आणि देशविरोधी कारवाया केल्याचा ठपका तपास यंत्रणांनी ठेवला आहे. पीएफआयच्या कारवाया लक्षात घेऊन तपास यंत्रणांनी संघटनेवर बंदी घालण्याची शिफारस केंद्रीय गृहमंत्रालयाला केली होती. त्यावर गृहमंत्रालयाने अध्यादेश काढत बंदी घातली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकमध्ये एका धार्मिक कार्यक्रमानिमित्त आले असताना त्यांनी आपले मत व्यक्त केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले कि, पीएफआयसारख्या देश विघातक संघटना आहेत, त्यांचा चोख बंदोबस्त केला पाहिजे. पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांना देशात राहण्याचा अधिकार असून पीएफआय संघटेनवर बंदी घातली ती योग्य आहे. शिवाय पाकिस्तानच्या घोषणा देणाऱ्यांवर कठोर करावाई करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाअसल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी पीएफआय सारख्या संघटनेवर बंदी घातल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले आहेत. गृहमंत्री अमित शाह यांनी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या पीएफआय संघटनेवर बंदी घातली असून या निर्णयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले आहे. शिवाय प्रतिक्रिया देताना म्हणाले कि, पीएफआय सारखा देशद्रोही संघटना आहेत, या देशासाठी धोकदायक असून यावर बंदी घातली हे योग्य केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. राज्यात पाकिस्तान जिंदाबादचे घोषणा देणाऱ्यांना देशामध्ये राहण्याचा अधिकार नाही, त्यांना माफ करणार नाही. या सर्वांचा चोख बंदोबस्त केला जाईल, असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.

हे ही वाचा:

शिवसेना-शिंदे गटाच्या सुनावणीमुळे सर्वोच्च न्यायलयाने समोर आलेली एक चांगली संधी गमावली – प्रकाश आंबेडकर

Tata Tiago EV : कार खरेदी करण्याचा विचार करताय?, टाटानं लॉन्च केली देशातील स्वस्त इलेक्ट्रिक कार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss