spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

World Heart Day 2022 : हृदयाच्या आरोग्याविषयी लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी पी.डी. हिंदुजा हॉस्पिटलचा एक अनोखा प्रयोग

सप्टेंबर २९ हा दिवस ‘जागतिक हृदय दिन’ म्हणून जगभरात साजरा (World Heart Day is celebrated on September 29) केला जातो. जागतिक हृदय दिन (World Heart Day) हा कौटुंबिक, शासकीय, सामाजिक पातळीवर हृदयांच्या आरोग्यासंबंधी जनजागृती पसरवण्यासाठी साजरा केला जातो. वर्ल्ड हार्ट फेडरेशनच्यामते (CVD) धुम्रपान, डायबिटीस, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, प्रदुषण यांमुळे हृदयासंबंधी आजार वाढत आहेत. यावर्षी अनेक लोक एकतर हृदयविकारांचा सामना करत आहेत तर दुस-या बाजूला हार्ट अटॅक आणि स्ट्रोक्सचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे. प्रत्येकासाठीच कार्डिओव्हॅस्क्युलर अर्थात हृदय आणि रक्तवाहिन्यांचे आरोग्य जपणे किती महत्त्वाचे आहे ही बाब अधोरेखित करण्यासाठी पी.डी. हिंदुजा हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च सेंटरतर्फे २७ ते २९ सप्टेंबर या दिवसांत सकाळी ७ ते संध्याकाळी ५ या वेळेत हॉस्पिटलच्या आयपीडी इमारतीवर होलोग्राफच्या माध्यमातून धडधडणाऱ्या हृदयाची प्रतिमा प्रदर्शित केली गेली आहे.

या उपक्रमाच्या माध्यमातून हृदयाचे आरोग्य अखंड जपण्याच्या महत्त्वाविषयी जनजागृतीस चालना देण्याचा हॉस्पिटलचा हेतू आहे. याबरोबरच चालणे, पावलांची संख्या वाढविणे आणि अधिक निरोगी जीवनशैली स्वीकारणे या गोष्टींचा शुभारंभ करण्याचे प्रोत्साहन देण्यासाठी हॉस्पिटलतर्फे ‘हिंदुजा हॉस्पिटल हेल्थी हार्ट चॅलेंज’ ही ३ दिवसांची फिटनेस स्पर्धाही आयोजित करण्यात येणार आहे. कार्डिओव्हॅस्क्युलर आजार (सीव्‍हीडी) हे भारतातील मृत्यूंमागच्या काही प्रमुख कारणांपैकी एक आहे. जागतिक आरोग्य संघटनेने असंसर्गजन्य आजार (non-communicable diseases – NCDs) विषयी जारी केलेल्या राष्ट्रवार आकडेवारीनुसार एकूण मृत्यूंपैकी जवळ-जवळ ५३ टक्‍के मृत्यू हे एनसीडींमुळे होतात असा अंदाज आहे. यामध्ये सीव्‍हीडींचा वाटा सर्वात मोठा म्हणजे सुमारे २४ टक्‍के आहे.

हेही वाचा : 

Lata Mangeshkar: लतादीदी पाहायला मिळणार ‘या’ डॉक्युमेंटरीमार्फत

देशभरात घेतल्या गेलेल्या वैद्यकीय पाहण्यांनुसार चाळीशीच्या आतल्या जवळ-जवळ २५ टक्‍के भारतीयांना हार्ट अटॅक येण्याचा धोका असतोच तर, इतरांना हृदयाशी संबंधित गुंतागुंतीचे आजार जडण्याची शक्यता आहे. ४० ते ५० वर्षे वयोगटातील व्यक्तींच्या बाबतीत हा धोका ५० टक्क्यांनी वाढतो. या गोष्टीची नोंद घेत हृदयाच्या आरोग्याचे महत्त्व आणि नियमित व्यायाम, रक्तातील साखरेच्या पातळीवर देखरेख ठेवणे, रक्तदाब आणि ८ तासांची झोप यांसारख्या आरोग्यदायी सवयींचा आपल्या आयुष्यात अंतर्भाव करण्याचे महत्व अधोरेखित करणे हे पी.डी. हिंदुजा हॉस्पिटल अँड एमआरसीचे उद्दीष्ट आहे.

या प्रसंगी बोलताना पी.डी. हिंदुजा हॉस्पिटल आणि एमआरसीचे सीओओ श्री. जॉय चक्रबोर्ती म्हणाले, “हृदयाचे आरोग्य हा भारतामधील एक महत्त्वाचा विषय आहे. अलीकडच्या काळात, विशेषत: तरुण व्यक्तींमध्ये हार्ट अटॅकची प्रकरणे वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर एका स्वस्थ आयुष्याची हमी मिळविण्यासाठी हृदयाच्या आरोग्याकडे लक्ष देणे व त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे. हृदयविकाराच्या या वाढत्या प्रमाणाला कारणीभूत ठरणाऱ्या काही महत्त्वाच्या कारणांपैकी एक कारण म्हणजे कामाच्या लांबलचक वेळेमुळे वाढणारी ताणतणावांची पातळी, कमी झालेली झोप, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि शारीरिक हालचालींचा अभाव. आपल्या जगण्यामध्ये आरोग्यदायी सवयींचा अंतर्भाव करण्याबरोबरच लोकांनी नियमितपणे आरोग्य तपासण्या करून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे, जेणेकरून आपल्याला हृदयविकाराचा आणि अन्य गंभीर गुंतागुंतीचा धोका किती संभवतो हे त्यांना निश्चितपणे समजू शकेल. हा उपक्रमाच्या माध्यमातून हृदयाच्या आरोग्याला प्राधान्य देण्याविषयी जागरुकता निर्माण करणे हा आमचा हेतू आहे.”

Festival holidays : बच्चे पार्टीसाठी खुशखबर, ऑक्टोबर महिना घेऊन येतोय तब्बल १० दिवसांची शालेय सुट्टी

पी.डी. हिंदुजा हॉस्पिटल आणि एमआरसीचे कन्सल्टन्ट कोरोनरी इंटरव्हेन्शनिस्ट डॉ. राजेश रजनी म्हणाले, “योग्य आहार आणि नियमित व्यायाम या गोष्टी महत्त्वाच्या आहेत व त्यांच्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते हे सर्वज्ञात आहे, त्याचप्रमाणे झोपही हृदयाचे आरोग्य जपण्यामध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावते. झोपेच्या नव्या प्रमाण कालावधीनुसार असे दिसून येते की, झोपेचा एकूण आरोग्यावर परिणाम होतो व ज्या व्यक्तींची झोप पूर्ण होते आणि ज्यांचे निद्रेचे चक्र इतरांच्या तुलनेत अधिक निरोगी असते अशा व्यक्ती वजन, रक्तदाबासारख्या समस्या अधिक चांगल्या पद्धतीने सांभाळतात तसेच त्यांना टाइप टू डायबेटिसचा धोकाही कमी असतो. अपुऱ्या वेळेची झोप आणि झोपेचा खालावलेला दर्जा या गोष्टींचा उच्च रक्तदाब, कॉलेस्ट्रोलची वाढती पातळी आणि अॅथेरोस्क्लेरोसिसशी संबंध असल्याचे अनेक अभ्यासांतून अधोरेखित झाले आहे. इतकेच नव्हे तर थोडीशी झोप काढून चटकन उठण्याची सवय लावून घेतल्यानेही कार्डिओव्हॅस्क्युलर समस्यांची शक्यता वाढते.”

सहा जिल्ह्याला एक पालकमंत्री म्हणजे ते काय ‘स्पायडरमॅन’ आहेत का ?, नाना पाटोलेंचं व्यक्तव्य

Latest Posts

Don't Miss