spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

“सनसनीखेज” बातम्यातून जमले तर; पंकजा मुंडेंचं ट्वीट

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या एका वक्तव्याची कालपासून जोरदार चर्चा सुरू असून, ‘मी जनतेच्या मनात असेल तर मला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) देखील हरवू शकत नाहीत’ अश्या त्यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र यासर्व प्रकरणावर आता खुद्द पंकजा मुंडे यांनी खुलासा केला आहे. मोदीजींचा उल्लेख हा सकारात्मक अंगाने केला असुन, यात मोदीजींबद्दल कुठलेही नकारात्मक उल्लेख केला नसल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

 यावर बोलतांना पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत की, मी आपल्या भाषणातून येणाऱ्या निवडणुकांमध्ये प्रचलित जात, पात, पैसा या मार्गांऐवजी जनतेच्या हृदयात स्थान मिळवण्याकरीता नविन पद्धतीचे राजकारण करण्याचे आवाहन केले होते. या संदर्भाने ऊपस्थित बालकांच्या पिढीला चांगल्या राजकीय संस्कृतीची गरज सांगत असताना मोदीजींचा उल्लेख केला होता. त्यामुळे मोदीजींचा उल्लेख हा सकारात्मक अंगाने केला असुन, यात मोदीजींबद्दल कुठेही नकारात्मक उल्लेख केलेला नाही. पंतप्रधान मोदीजींचा उल्लेख सर्वश्रेष्ठ रणधुरंधर राजकीय नेतृत्व या पद्धतीने केलेला आहे. तर “चांगले काम केले तर मोदीजी सुद्धा पराभव करु शकणार नाहीत” असा सकारात्मक संदर्भ यामागे असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

तर याबाबत पंकजा मुंडे यांनी एक ट्वीट केला असून ज्यात त्यांनी म्हटले आहे की, “मोदींजींच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर पासून विविध कार्यक्रम केले. त्यात बुद्धिजीवी संमेलन मधील माझ्या भाषणाच्या highlights आपल्या पर्यंत एक ओळ आलीच आहे. “सनसनीखेज” बातम्यातून जमले तर हेही पहा, मतितार्थ लक्षात येईल. पूर्ण भाषण ऐकावे वाटल्यास या link वर आहेच…”

अनेकदा असे होते की, पात्रता नसताना मुख्यमंत्र्यांचा मुलगा म्हणून एका पदावर जातो. एखाद्या राष्ट्रीय अध्यक्षाचा मुलगा म्हणून पात्र नसतानाही त्या पदावर जाण्याचा प्रयत्न करतो. नेमका हाच भाव पंकजा मुंडेंचा असावा असे मला वाटते. मात्र, यासंबंधीचे अधिक स्पष्टीकरण पंकजा मुंडे यांच्याकडूनच घेतले पाहिजे असे मुनगंटीवार म्हणाले.मोदी मला संपवू शकत नाहीत असा पंकजा मुंडेंच्या म्हणण्याचा अर्थ नव्हताच असेदेखील मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. मोदींनी वंशवाद संपवण्याचा निर्णय घेतला आहे, पण मी जर जनतेच्या ह्रदयाचं प्रतिक असेन तर निश्चितच या वंशवादात बसणार नाही अशी प्रतिक्रिया देत मुनगंटीवार यांनी पंकजा मुंडेंची पाठराखण केली आहे.

हे ही वाचा:

Thackeray vs Shinde : राज्याचा सत्तासंघर्ष तब्ब्ल एक महिना लांबणीवर

World Heart Day 2022 : हृदयाच्या आरोग्याविषयी लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी पी.डी. हिंदुजा हॉस्पिटलचा एक अनोखा प्रयोग

Follow Us

Latest Posts

Don't Miss