spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

भगर विषबाधा प्रकरणी पोलिसांनी ८ किराणा दुकानदारांच्या विरोधात कारवाई

काही दिवसांपुरची अमरावती मध्ये धक्कादायक घटना घडल्याचे समोर आली होते. जिल्ह्यात आतापर्यंत अंदाजे दीडशे लोकांना भगरीतून विषबाधा झाली आहे. त्यामुळे आता प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आल्याचे पाहायला मिळत आहे. कारण याप्रकरणी पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. औरंगाबाद ग्रामीणच्या वैजापूर पोलिसांनी ८ किराणा दुकानदारांच्या विरोधात कारवाई करत गुन्हे दाखल केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैजापूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी कुलदीप सिद्धार्थ नरवडे यांनी यांच्या तक्रारीवरून एकूण आठ दुकानांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ज्यात वैजापूर शहरातील ‘सबका मलिक एक’ या दुकानाचे मालक रमेश गोरक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच घायगाव आणि लोणी बु.येथील अशा एकूण ८ किराणा दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत करण्यात आलेल्या उल्लेखानुसार, वरील सर्व दुकानदारांनी आपली दुकानात असलेले भगर आणि पीठ अपचनकारक असल्याचे माहित असतांना सुद्धा ग्राहकांना विकले. नागरिकांनी ते भगर खळ्यांनी त्यांना विषबाधा झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या शारिरीक वेदना आणि रोग निर्माण केल्याच्या कायद्यानुसार या दुकानदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर,गंगापूर आणि कन्नड तालुक्यातील विविध गावातील नागरिकांना भगर खाल्याने विषबाधा झाली आहे. ज्यात वैजापूर तालुक्यातील ११८ गावकऱ्यांना भगरमधून विषबाधा झाली आहे. तर गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील २५ पेक्षा अधिक नागरिकांना विषबाधा झाली आहे. तर कन्नड तालुक्यातील १२ पेक्षा अधिका लोकांना विषबाधा झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. विषबाधा झालेल्या ग्रामस्थांमध्ये महिलांची संख्या जास्त आहे.

हे ही वाचा:

“सनसनीखेज” बातम्यातून जमले तर; पंकजा मुंडेंचं ट्वीट

Lata Mangeshkar: लतादीदी पाहायला मिळणार ‘या’ डॉक्युमेंटरीमार्फत

Follow Us

Latest Posts

Don't Miss