spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

सर्वसामान्यांसाठी एक सुखद बातमी, केंद्र सरकारची रेशन बाबत मोठी घोषणा

येत्या सणासुदीच्या काळात मोदी सरकारने देशातील गरीब जनतेला मोठा दिलासा दिला आहे. सरकारने मोफत रेशन देणाऱ्या योजनेची मुदत अजून तीन महिने वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

येत्या सणासुदीच्या काळात मोदी सरकारने देशातील गरीब जनतेला मोठा दिलासा दिला आहे. सरकारने मोफत रेशन देणाऱ्या योजनेची मुदत अजून तीन महिने वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हि योजनेची ३० सप्टेंबर २०२२ रोजी संपणार होती. परंतु या अगोदरच, सरकारने या योजनेला तीन महिन्यांसाठी म्हणजे या वर्षाच्या अखेरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. या घोषणेने नंतर देशवासीयांना नक्कीच दिलासा मिळणार आहे.

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज २८ सप्टेंबर बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांनाही मोठी भेट दिली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्येही ४ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.

अर्थ मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, तीन महिन्यांसाठी मोफत रेशनची योजना पुढे वाढवल्यामुळे तिजोरीवर ४५,००० कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. केंद्र सरकारने शिल्लक धान्याच्या साठ्याचा आढावा घेतल्यानंतर हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या सरकारकडे धान्याचा साठा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. या अगोदर मोफत रेशनची योजना आता बंद होईल, अशी चर्चा होती.

एप्रिल २०२० मध्ये सुरू झाली होती योजना

केंद्र सरकारने एप्रिल २०२० मध्ये कोविड काळात ही योजना सुरू केली होती. नंतर मार्च २०२२ मध्ये ती सहा महिन्यांसाठी सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली. आता सरकारने पुन्हा एकदा तीन महिन्यांसाठी म्हणजेच डिसेंबर २०२२ पर्यंत हिची मुदत वाढविली आहे. मात्र, काही माध्यमांत ही योजना सहा महिन्यांसाठी वाढविण्यात आल्याचे बोलले जात आहे.

हे ही वाचा:

Receptionist Murder Case: वेश्याव्यवसाय नाकारल्यामुळे मृत्यू, उत्तराखंड घटनेमुळे भाजपवर भडकले राहुल गांधी

पीएफआयवर बंदी घालण्याच्या निर्णयाचं समर्थन केलं जाऊ शकत नाही- असदुद्दीन ओवैसी

उत्तराखंड रिसॉर्ट हत्येची होणार फास्ट-ट्रॅक सुनावणी, मुलीच्या कुटुंबासाठी २५ लाख रुपये जाहीर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss