spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Video Viral : भर गरबा कार्यक्रमात शिरलेल्या मुस्लिम तरुणाला बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून जबर मारहाण

अहमदाबादमधील कर्णावती क्लबमध्ये गरबा कार्यक्रमाला मुस्लिम तरुणांनी हजेरी लावल्याने बजरंग दलाने गोंधळ घातला. समोर आलेल्या माहितीसुनार बजरंग दलाचे कार्यकर्ते शहरातील गरबा स्थळांना भेट देत असताना त्यांना सिंधू भवन परिसरात चार मुस्लिम तरुण दिसले. कार्यकर्त्यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान तिघे पळून जाण्यात यशस्वी झाले तर एकाला पकडण्यात आले, त्यात त्यांनी त्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याला तेथून हाकलण्यात आले. बजरंग दलाचे म्हणणे आहे की मुस्लिम तरुण हिंदू मुलींना आकर्षित करण्यासाठी आणि चुकीच्या हेतूने गरबा कार्यक्रमात भाग घेतात.

हेही वाचा : 

LPG Cylinders: LPG ग्राहकांसाठी मोठी बातमी! आता वर्षाकाठी केवळ १५ सिलेंडर मिळणार

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये काही तरुणांना त्यांच्या धार्मिक ओळखीबद्दल प्रश्न विचारण्यात आले आहेत आणि भगवा ब्रिगेडने त्यांना मारहाण केली आहे. गरब्यात मुस्लीम तरुणांनी मुलींची छेड काढल्याच्या आणि चोरी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी विश्व हिंदू परिषदेने गरब्यात येणाऱ्यांचे आधारकार्ड तपासून प्रवेश द्या, असे आवाहन केलं होते. त्यानंतर हा प्रकार घडल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

Rain Updates : परतीच्या पावसाची जोरदार बॅटिंग सुरु; मराठवाड्यात पिकांचं नुकसान

दरम्यान अद्याप या घटनेबाबत कोणतीही पोलीस तक्रार करण्यात आलेली नाही. मात्र या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. पोलिसांनी चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. चौकशीत कुणी दोषी आढळलं, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असंही सांगण्यात आलं आहे.

टेंभी नाका देवीच्या आरतीचा मान कोणाला?

Latest Posts

Don't Miss