spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Ind vs SA: भारतचा दक्षिण आफ्रिका विरोधात दणदणीत विजय

टी-२० विश्वचषक स्पर्धेआधीच्या भारतीय संघाच्या शेवटच्या मालिकेतील पहिला टी-२० सामना बुधवारी भारताने आठ गडी राखून जिंकला. एकतर्फी झालेल्या या सामन्यामध्ये भारतीय सलामीवीर के. एल. राहुल आणि मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव यांनी नाबाद राहत अर्धशतकं झळकावली. या विजयासह भारतानं तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तिरुअनंतपुरमच्या (Thiruvananthapuram) ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर (Greenfield International Stadium) पहिला एकदिवसीय सामना खेळला गेला. या सामन्यात पुनरागमनाची संधी मिळालेल्या भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह (Arshdeep Singh) आणि दीपक चाहरच्या (Deepak Chahar) भेदक गोलंदाजीमुळं दक्षिण आफ्रिकेच्या संघाला १०६ रोखण्यात भारतीय संघाला यश आलं. हर्षल पटेलनंही या सामन्यात चांगली गोलंदाजी केली.

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने २० षटकांत ८ गडी गमावून १०६ धावा केल्या. केशव महाराज यांनी सर्वाधिक ४१ धावांची खेळी खेळली. त्याचवेळी अर्शदीप सिंगने तीन विकेट घेतल्या. प्रत्युत्तरात भारताने लक्ष्याचा पाठलाग १६.४ षटकांत दोन गड्यांच्या मोबदल्यात केला. सूर्यकुमार ३३ चेंडूत ५० आणि केएल राहुल ५६ चेंडूत ५१ धावांवर नाबाद राहिला. राहुलने षटकार मारून सामना संपवला. १६व्या षटकातील पाचव्या चेंडूवर त्याने तबरेज शम्सीला षटकार ठोकून टीम इंडियाला विजय मिळवून दिला. या विजयासह भारतीय संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. पुढील सामना २ ऑक्टोबर रोजी गुवाहाटी येथील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.

सूर्यकुमारने यावर्षीच्या म्हणजेच २०२२ च्या टी-२० सामन्यांमध्ये ७०० धावांचा टप्पा ओलांडला आहे. एका वर्षाच्या कालावधीमध्ये टी-२० सामन्यांत ७०० धावांचा पल्ला ओलांडणारा सूर्यकुमार हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याने २०१८ साली शिखर धवनने केलेला ६८९ धावांचा विक्रम मागे टाकला आहे. सूर्यकुमारने केवळ हा विक्रम मोडीत काढलाय असं नाही तर त्याने ज्या सरासरीने धावा केल्या आहेत ती सुद्धा आश्चर्यकारक आहे. त्याने १८० च्या स्ट्राइक रेटने आणि प्रत्येक सामन्याला ४० धावांच्या सरासरीने हा ७०० धावांचा पल्ला गाठला आहे.

हे ही वाचा:

नव्या काळातले युद्ध समाज माध्यमांवर लढले जाते – पंकजा मुंडे

आशिष शेलारांनी शिवसेनेला लगावला खोचक टोला

Follow Us

 

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss