spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘मी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नाही, सोनिया गांधींची माफी मागितली’, दीड तासाच्या बैठकीनंतर गेहलोत स्पष्टीकरण

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. नवी दिल्लीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी सांगितले की, मी त्यांच्यासोबत झालेल्या बैठकीत संपूर्ण गोष्ट स्सांपष्गिट केली आहेत. गेहलोत म्हणाले की, शेवटच्या दिवसातील घटनेने सर्वांना हादरवून सोडले. मला मुख्यमंत्रीपदी राहायचे आहे, मी सोनिया गांधींची माफी मागितली आहे, गेली ५० वर्षे काँग्रेससाठी निष्ठेने काम केले, सोनिया गांधींच्या आशीर्वादाने मी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झालो. असे मत त्यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा : 

आता आपले सण उत्सव हे बंधन घालूनच साजरे करावे लागणार – सुप्रिया सुळे

या निवडणुकीसाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह उमेदवारी अर्ज भरण्याच्या तयारीत असतानाच अशोक गेहलोत यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक न लढवण्याची घोषणा केली आहे. लोकसभा सदस्य शशी थरूर ३० सप्टेंबर रोजी सभापतीपदासाठी अर्ज दाखल करणार आहेत. राजस्थानमधील राजकीय संकटादरम्यान, पक्षाचे निरीक्षक मल्लिकार्जुन खर्गे आणि अजय माकन यांनी मंगळवारी (२७ सप्टेंबर) मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या जवळच्या तीन नेत्यांवर “घोर अनुशासनात्मक” केल्याबद्दल शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिफारस केली. त्यानंतर काही वेळातच पक्षाच्या शिस्तपालन कृती समितीने त्यांना ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावली होती.

Nitin Gadkari : वाहतूक मंत्री गडकरींची घोषणा, ‘या’ तारखेपासून होणार ६ एअरबॅग्ज अनिवार्य

राजस्थानमधील संकटापूर्वी गेहलोत यांनी पक्षाध्यक्षपदासाठी अर्ज भरणार असल्याचे सांगितले होते. मात्र, राज्यातील राजकीय घडामोडींनंतरच त्यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. आता सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यानंतर छगन भुजबळांनी केली सारवासारव

Latest Posts

Don't Miss