spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

रश्मी ठाकरे मुख्यमंत्री शिंदेंच्या बालेकिल्ल्यात, टेंभीनाक्याच्या देवीची महाआरती करणार का?

शिवसेना कुणाची यावरून शिंदे आणि ठाकरे यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. दोन्ही गट एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यानंतर आता रश्मी ठाकरे यांनीही शिंदे समर्थकांविरोधात कंबर कसली असल्याचे येत्या काळात पाहायला मिळणार आहे. नवरात्रोत्सवानिमित्त रश्मी ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात दाखल झाल्या आहेत. रश्मी ठाकरे आज ठाण्याच्या टेंभीनाका इथेही आनंद दिघे यांच्या देवीची आरती करणार का असा प्रश्न राजकारणानंसह जनतेला प्रश्न पडला आहे. दरवर्षी रश्मी ठाकरे टेंभीनाक्याला देवीच्या दर्शनाला येत असतात. त्याचबरोबर नवरात्रौत्सवानिमित्त शिवसेनेकडून ‘बये दार उघड’ ही मोहीम आयोजित करण्यात आली आहे. या मोहीमेचा एक भाग म्हणून रश्मी ठाकरे आज टेंभीनाक्याच्या देवीच्या दर्शनासाठी जाणार आहेत.

हेही वाचा : 

वाराणसीतील भुताचा व्हिडिओ होतोय व्हायरल, पांढऱ्या आकृतीमुळे भीतीचं वातावरण

दरम्यान रश्मी ठाकरे यांच्या या ठाणे दौऱ्यावर शिंदे गटात गेलेल्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी टोला लगावला आहे. ‘अरेरे..मा.रश्मी वहिनी ठाण्याला जाणार आहेत म्हणून शिल्लक सेनेला असे संदेश करुन मुंबई मधून महिला गोळा करुन गर्दी दाखवायचा केविलवाणा प्रयत्न करावा लागत आहे…’ असं ट्वीट करत शीतल म्हात्रे यांनी शिवसेनेच्या एका व्हॉट्सऍप ग्रुपचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे.

‘मी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नाही, सोनिया गांधींची माफी मागितली’, दीड तासाच्या बैठकीनंतर गेहलोत स्पष्टीकरण

‘उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ते कुठेही गेले तरी रश्मी वहिनी त्यांच्यासोबत असायच्या. माँसाहेब मीनाताई ठाकरे या आयुष्यात कधीही व्यासपीठावर चढल्या नाहीत. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना केवळ तीन वेळा मंत्रालयात गेले आहेत. इतर वेळी ते मातोश्रीवर लपून खोके मोजण्याचे काम करत होते. तर रश्मी ठाकरे या वर्षा बंगल्यावर कंत्राटदारांना भेटत होत्या.’ असा गंभीर आरोप रामदास कदम यांनी केला होता.

Nitin Gadkari : वाहतूक मंत्री गडकरींची घोषणा, ‘या’ तारखेपासून होणार ६ एअरबॅग्ज अनिवार्य

Latest Posts

Don't Miss