spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

एकता कपूरच्या अडचणीत वाढ XXX मालिकेनंतर होतेय पद्मश्री परत घेण्याची मागणी

XXX च्या मालिकेबद्दल आहे कारण काही लोकांनी या शोविरुद्ध न्यायालयात तक्रार केली आहे.

निर्माती एकता कपूर (Ekata Kapoor) आणि तिची आई शोभा कपूर (Shobha Kapoor) यांच्या अडचणीत आता वाढ झाली आहे. बिहारच्या बेगुसरायच्या न्यायालयाने आई आणि मुलीविरुद्ध अटक वॉरंट जारी केले आहे. हे वॉरंट एकता कपूर, XXX च्या मालिकेबद्दल आहे कारण काही लोकांनी या शोविरुद्ध न्यायालयात तक्रार केली आहे. XXX ही एक वेब सीरिज आहे जी एकताच्या OTT प्लॅटफॉर्म, ALT बालाजीवर स्ट्रीम केली जाऊ शकते.

बेगुसराय येथील न्यायालयाने एकता कपूर आणि तिची आई शोभा कपूर यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले आहे. या दोघांवर जवानांचा अपमान आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या भावना दुखावल्याचा आरोप लावण्यात आला आहे. न्यायालयाच्या वतीने न्यायाधीश विकास कुमार यांनी हे वॉरंट जारी केले आहे.

माजी सैनिक असलेल्या शंभू कुमार यांनी ही तक्रार दाखल केली होती. २०२० मध्ये दाखल केलेल्या या तक्रारीत शंभू कुमार म्हणतात की, XXX नावाच्या वेब सीरिजमध्ये अशी अनेक आक्षेपार्ह दृश्ये आहेत जी एका सैनिकाच्या पत्नीशी संबंधित आहेत. कोर्टाने एकता आणि तिच्या आईला कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. एकतानेही न्यायालयाला कळवले आहे की, ज्या सीनवर आक्षेप घेण्यात आले होते ते सीन्स या मालिकेतून काढून टाकण्यात आले आहेत.

नेटकऱ्यांकडून होतेय पद्मश्री परत घेण्याची मागणी…

बिहारमधील या केसनंतर एकता कपूरच्या एका व्हायरल व्हिडिओमुळे सध्या नेटकरी तिला चांगलेच ट्रोल करत आहेत. या व्हिडिओत एकता गरिबांना फळे वाटताना दिसत आहे. मात्र, तिची फळे वाटण्याची पद्धत फार चुकीची असल्याने सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. तसेच या व्हिडीओनंतर #shame onyou ektaakapoor आणि #boycottbollywood हे हॅशटॅग्ज पुन्हा एकदा ट्रेंड होऊ लागले आहेत.

हे ही वाचा:

‘एकनाथ शिंदेंच्या सभा या बाळासाहेबांच्या आहेत की काय, असा भास होतो’ उदय सामंतांचे व्यक्तव्य

CM एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्याच्या पोस्टरनंतर, टीझरची झलक आली समोर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss