spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

ॲसिडिटीचा त्रास कमी होण्यासाठी प्या ही ३ पेय, दिसाल फ्रेश

सकाळी उठल्यावर चहा कॉफी पिणे टाळा . आपली त्वचा कायम सुंदर दिसावी यासाठी आपण काही ना काही करत असतो. कधी पार्लरच्या महागड्या ट्रीटमेंट करतो तर कधी ब्रँडेड ब्यूटी प्रॉडक्टस वापरतो. मात्र आपली त्वचा बाहेरून निरोगी नाहीतर आतून देखील निरोगी राहिली पाहिजे. आपले पोट स्वच्छ असेल तर चेहरा नितळ आणि तजेलदार दिसतो. नाहीतर चेहऱ्यावर पिंपल्स येणे, फोड येणे, डाग पडणे अशा समस्या उद्भवतात. तसेच आपण बाहेरील पदार्थाचा समावेश केल्याने त्वचेचा बरेच समस्या उद्भवतात. अशा समस्या उद्भवू नयेत आणि चेहरा कायम सुंदर आणि तजेलदार दिसण्यासाठी आपण काही घरगुती उपाय करू शकतो .

हे ही वाचा : थायरॉईड नियंत्रणात आण्यासाठी घरगुती उपाय

 

रात्रभर आपण काही खाल्लेले नसल्याने सकाळी उठल्यावर आपण सगळ्यात आधी जे खातो त्यातून शरीराला चांगले पोषण मिळण्यास मदत होते. त्यामुळे सकाळी उठल्यावर काही हेल्दी पेय प्यायल्यास त्वचा आणि केस दोन्हीसाठी त्याचा अतिशय चांगला फायदा होऊ शकतो . ही पेय आपण घरच्या घरी तयार करू शकतो .

हळदीचे दूध आरोग्यासाठी चांगले असते तसेच त्वचेसाठीही देखील फायदेशीर असते. हळदीतील अँटीबॅक्टेरीयल गुण त्वचा स्वच्छ राहण्यासाठी उपयुक्त ठरतात. हळदीच्या दुधात अँटीऑक्सिडंटस असतात. तसेच त्वचा तजेलदार दिसण्यासाठीही हळदीचे दूध फायदेशीर असते.

 

तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या चहा प्यायची सवय असेल तर त्यात थोडा बदल करा . नेहमीचा चहा पिण्यापेक्षा सकाळी उठल्यावर ग्रीन टी प्या .

कोमट पाण्यात लिंबू आणि मध घालून प्यायल्यास शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडण्यास मदत होते. टॉक्सिन्स बाहेर पडली तर चेहरा नितळ दिसण्यास मदत होते. आपल्या त्वचेला कोणते इन्फेक्शन असेल तर ते निघून जाण्यासाठी लिंबाच्या रसाचा उपयोग होतो . मधामध्येही अँटीबॅक्टेरीयल आणि अँटीइन्फ्लमेटरी गुणधर्म असतात .

हे ही वाचा : 

चेहरा गोरा पण मान काळपट तर करा हे उपाय

 

Latest Posts

Don't Miss