Friday, September 27, 2024

Latest Posts

टेंभीनाका देवीच्या दर्शनानंतर रश्मी ठाकरेंनी दिली संजय राऊतांच्या घरी भेट

टेंभीनाक्याच्या देवीच्या दर्शनानंतर रश्मी ठाकरे या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी गेल्या होत्या.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात आज रश्मी ठाकरे यांनी उपस्थिती लावत टेंभीनाका देवीची आरती केली. टेंभीनाक्याच्या देवीच्या दर्शनानंतर रश्मी ठाकरे या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी गेल्या होत्या. त्यांनी संजय राऊत यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. रश्मी ठाकरे या ठिकाणी येणार असल्याने शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती.

शिवसेनेतील फुटीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (rashmi thackeray) पहिल्यांदाच ठाण्यात आल्या होत्या. ठाण्यात आल्यानंतर त्यांनी आनंद दिघे यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. त्यानंतर त्यांनी टेंभी नाका येथील देवीची आरती केली. यावेळी शिवसैनिकांची तुफान गर्दी झाली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांनी बंड केल्यानंतर ठाण्यातील शिवसेनेचं अस्तित्व संपुष्टात आल्याचं बोललं जात होतं. ठाण्यातील जवळपास सर्वच नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने शिवसेना ठाण्यातून हद्दपार झाल्याचीही चर्चा होती. पण आज रश्मी ठाकरे ठाण्यात येताच हजारो शिवसैनिक एकटवल्याने ठाण्यात शिवसेना अजूनही भक्कम असल्याचं स्पष्ट झालं. शिवसेनेच्या आजच्या शक्तिप्रदर्शनामुळे शिंदे गटाला तगडं आव्हान उभं राहणार असल्याचं सांगितलं जात आहे.

टेंभीनाक्याच्या देवीच्या दर्शनानंतर रश्मी ठाकरे यांना देवीकडे काय मागणे मागितले? असा प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्यांनी सर्वांना सुखी ठेव, असं उत्तर दिलं. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही रश्मी ठाकरे यांच्या टेंभीनाका देवीच्या दर्शनाबाबत विचारण्यात आलं, तेव्हा यावर मी फार बोलणार नाही, देवीचं दर्शन घेण्यावर कुणालाही बंदी नाही, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली. दरम्यान टेंभीनाका देवीच्या आरतीमुळे शिंदेगट आणि ठाकरेगट पुन्हा आमने – सामने येणार असे वाटत होते. मात्र, शिंदे गटाकडून रात्री ९ वाजता देवीची आरती करण्यात येणार असल्यामुळे हा वाद टळला आहे.

हे ही वाचा:

वरूण धवनचा ‘भेडिया’ चित्रपट या दिवशी प्रेक्षकांच्या भेटलीस येणार, पोस्टर आले समोर

एकता कपूरच्या अडचणीत वाढ XXX मालिकेनंतर होतेय पद्मश्री परत घेण्याची मागणी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss