spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

परतीच्या पावसाची बॅटिंग; येत्या तीन दिवसांत विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस

काल संद्याकाळी पावसाने राज्यातील अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची धांदल उडाली. तर काही ठिकाणी मुसळधार पावसाने रस्त्यावर पाणी आले होते. यामुळे शहरातील भागांत वाहतुककोंडी झाली होती. तर येणाऱ्या चार दिवसांत मध्यम सरींचा अंदाज असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे. त्याबरोबर येणाऱ्या तीन ते चार दिवसांत कोकण, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रातून ५ ते १० ऑक्टोबर दरम्यान मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

हेही वाचा : 

RBI Hike Repo Rate : तुमच्या कर्जाचा EMI वाढणार

पुढील चार दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव, औरंगाबाद, पुणे, अहमदनगर, नाशिक, ठाणे आणि चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड गडचिरोली या जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासंदर्भातील माहिती हवामान खात्याचे माजी अधिकारी माणिक खुळे यांनी दिली.

यंदा मान्सूनच्या पावसाने अनेक ठिकाणचा शेतकरी सुखावला असून अनेक ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात अतिवृष्टीमुळे पाणी आले आहे. त्याचबरोबर आता रब्बीच्या पिकासाठी परतीचा पाऊस महत्त्वाचा असल्याने येत्या तीन दिवसांत राज्यातील विविध ठिकाणी कमी जास्त प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मराठवाड्यात परतीच्या पावसाने लावलेल्या हजेरीमुळे नुकसान झाल्याची माहिती आहे.

PM Modi News : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात दौऱ्यावर, आज वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार

आतापर्यंत सुमारे ३ हजार ९०० कोटी रुपयांच्या मदतीचे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाटप केले आहे. काही ठिकाणी हे मदतीचे वाटप सुरु असून सुमारे ३० लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना याचा लाभ झाला आहे. हे ३० लाख आणि आज मदतीचा निर्णय घेण्यात आलेल्या ७५५ कोटीच्या निधीमुळं अंदाजे ३६ लाख शेतकऱ्यांना शासनाच्या या निर्णयामुळं मोठा दिलासा मिळणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

Gold-Silver Price: दसऱ्या आधी सोन महागल, जाणून घ्या आजचं दर

Latest Posts

Don't Miss