spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

नवनियुक्त पालकमंत्री दादा भुसेंनी नाशिककरांचे मानले आभार !

काही दिवसांपूर्वी शिंदे फडणवीस (Shinde Fadnavis Government) सरकारने राज्यातील जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदी अनेक मंत्री, आमदारांची नियुक्ती केली.

काही दिवसांपूर्वी शिंदे फडणवीस (Shinde Fadnavis Government) सरकारने राज्यातील जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदी अनेक मंत्री, आमदारांची नियुक्ती केली. यामध्ये नाशिककरांचे लक्ष लागून असलेल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी मंत्री दादा भुसे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर प्रथमच आज पालकमंत्री दादा भुसे आज नाशिक दौऱ्यावर आले असून त्यांनी नाशिकचे ग्रामदैवत कालिका मातेचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

नवरात्रोत्सवाच्या (Navratri) निमित्ताने कालिका मातेचे (Kalika Mata) दर्शन घेऊन नाशिक (Nashik) जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार असून आज विविध लोकप्रतिनिधी, संस्था प्रशासन यांच्या सूचना जाणून घेऊन पुढील कामकाजाचा आराखडा तयार करणार असून नवनियुक्त पालकमंत्री दादा भुसे (Minister Dada Bhuse) यांनी नाशिक च्या जनतेचे आभार मानले. त्यावेळी ते बोलत होते. नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी विराजमान झाल्यानंतर मंत्री दादा भुसे यांनी आज नाशिक चे ग्रामदैवत कालिका मातेचे दर्शन घेत नाशिकच्या जनतेचे आभार मानले.

यावेळी पालकमंत्री दादा भुसे म्हणाले कि, पहिल्यांदा नाशिककरांचे आभार. नाशिककरांच्या सहकार्यामुळे आजचा दिवस असून आनंदाचा दिवस आहे. सर्वानी नवरात्री आनंदात साजरी करा. त्याचबरोबर आगामी काळात नाशिक जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाठी प्रयत्नशील राहणार आहोत. जिल्ह्यातील संस्था, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी यांच्या सूचना जाणून घेणार असून त्या दृष्टीने जिल्ह्यात अनेक प्रकल्प विकसित करणार असल्याचे ते म्हणाले. विकास प्रकल्पाबाबतचा अजेंडा जाहीर केला आहे. त्यानुसार वेगवेगळ्या लोकांच्या सूचना घेऊन त्यांच्यासोबत काम करणार आहोत. यासाठी लोकप्रतिनिधींच्या सूचना घेऊन नवीन प्रकल्प काय करणार याबाबत आराखडा तयार करणार असल्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी सांगितले.

हे ही वाचा:

Vikram Vedha : OTT प्लॅटफॉर्मवर हृतिक-सैफचा विक्रम वेध हिंदीमध्ये पहा विनामूल्य…

परतीच्या पावसाची बॅटिंग; येत्या तीन दिवसांत विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss