spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

IND vs SA: मोहम्मद सिराजचा टीम इंडियात समावेश; ‘या’ खेळाडूंची घेणार जागा

भारतीय क्रिकेट संघाला टी-२० वर्ल्डकपच्या आधी मोठा धक्का बसला आहे. संघातील स्टार जलद गोलंदाज जसप्रीत बुमराह (jasprit bumrah) दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर झाला आहे. बुमराहच्या जागी संघात कोणाचा समावेश होणार याबाबतची उत्सुकता सर्वांना होती. आता यासंदर्भात बीसीसीआयने मोठी घोषणा केली आहे. सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ३ सामन्यांची टी-२० मालिका सुरू आहे. या मालिकेसाठी भारतीय संघात जसप्रीत बुमराहच्या जागी मोहम्मद सिराज (mohammed siraj) चा समावेश करण्यात आल्याची घोषणा बीसीसीआयने केली आहे.

 मोहम्मद सिराजने टी-२० फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. इंडियन प्रीमियर लीगमधून तो चमकला आहे. सिराजने २०१७ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध त्याने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. सिराजने आतापर्यंत ५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून, यादरम्यान त्याने ५ विकेट्स घेतल्या आहेत. सिराजने फेब्रुवारी २०२२ मध्ये श्रीलंकेविरुद्ध शेवटचा टी-२० सामना खेळला होता. यात त्याने १० सामन्यात १३ विकेट्स पटकावल्या होत्या.

दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात ३ सामन्यांची टी-२० मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिली लढत भारताने ८ विकेटनी जिंकली होती. पहिला सामना झाल्यानंतर टीम इंडियाला मोठा झटका बसला होता. संघातील स्टार जलद गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे तो आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून बाहेर झाला. त्याच्या जागी उर्वरित दोन सामन्यांसाठी सिराजला संघात घेण्यात आले आहे. दोन्ही संघातील दुसरी लढत २ ऑक्टोबर रोजी गुवहाटी येथे तर तिसरी लढत ४ ऑक्टोबर रोजी इंदुर येथे होणार आहे. दुखापतीमुळे बुमराह पुढील महिन्यात १६ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपला मुकणार असल्याचे वृत्त आहे. याबाबत बीसीसीआयने अधिकृत काहीही माहिती दिली नाही. टी-२० वर्ल्डकपसाठी बुमराहची जागा कोण घेणार हे देखील अद्याप बीसीसीआयकडून सांगण्यात आलेले नाही.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय टी-20 संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकिपर), दिनेश कार्तिक (विकेटकिपर), आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, दीपक चहर, उमेश यादव, श्रेयस अय्यर, शाहबाज अहमद, मोहम्मद सिराज.

हे ही वाचा:

गुरुवारी होणार बुलेट ट्रेनच ठाणे जिल्ह्यात १०० टक्के भूसंपादन

Dasara Melava : दसरा मेळाव्यादिवशी अजित पवार पहिलं भाषण कोणाचं ऐकणार? पवारांनी दिली प्रतिक्रिया

Follow Us

Latest Posts

Don't Miss