spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘कॅन्सर होऊनही नेतृत्वाने साधी चौकशी केली नाही’, यामिनी जाधवांचा उद्धव ठाकरेंवर निशाण

शिवसेना मधून शिंदे गटात गेलेले आमदार यामिनी जाधव यांना कर्क रोगाचा आजार झाला आहे. यामिनी जाधव जेव्हा शिवसेनेत होत्या तेव्हा त्यांना कर्क रोग झाला होता. त्यानंतर त्यांना बघयाला कोण आलं नाही याची खंत आधी सुद्धा बोलून दाखवली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल म्हणजेच गुरुवारी कर्करोगाने ग्रस्त असलेल्या शिवसेना आमदार यामिनी जाधव यांची रुग्णलयात जाऊन प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर यामिनी जाधव यांनी पुन्हा पक्षनेतृत्वावर हल्लाबोल करत खंत व्यक्त केली आहे.

गेल्या काही दिवसापासून यामिनी जाधव या कर्करोगाने त्रस्त आहेत. त्यांच्यावर मुंबईतील सैफी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामिनी जाधव म्हणाल्या मागील ऑक्टोबर महिन्यापासून माझ्या आयुष्यात कॅन्सर नावाचं एक वादळ आलं. ज्यावेळी आम्हाला समजलं, त्यावेळी संपूर्ण कुटूंब तुटले. या आजाराची माहिती पक्षाच्या प्रमुख नेत्यांना यशवंत जाधव यांनी दिली. एक महिला आमदार म्हणून माझी अपेक्षा होती, की माझ्या घरी काही नेते येतील, आपल्या पक्षाच्या एका महिला आमदार कॅन्सरने त्रस्त आहेत, हीच गोष्ट मोठी हदरवणारी होती. मी स्वतः कॅन्सर या शब्दाने कोलमडून गेली होती. पण अशा परिस्थितीमध्ये माझ्या भायखळा मतदारसंघातील जनतेने, शिवसैनिकांनी खूप साथ दिली, मी आजही त्यांची आभारी आहे.

मी स्वतः २०१२ पासून नगरसेविका आहे. बऱ्याच आमदारांच्या पत्नींना कॅन्सर झाला, त्यांना भेटायला पक्षाचे नेते हॉस्पिटलमध्ये गेल्याचे मी माझ्या डोळ्याने पाहिले आहे. मग त्यांच्याप्रमाणे मी देखील मरणासन्न अवस्थेमध्ये गेल्यानंतर माझ्या पक्षातील नेते मला आधार द्यायला येणार होते का? ही गोष्ट मनाला खलत होती.याशिवाय मागील काही दिवसांपासून वेगवेगळ्या अडचणींमधून माझे कुटूंब जात आहे. त्यातही कोणी आधार, कोणाचे मार्गदर्शन, कोणाच्या चांगल्या सुचना आम्हाला मिळाल्या नाहीत. दोघेचं कुटूंबासाठी हात-पाय मारत राहिलो, आणि मग या निर्णयापर्यंत पोहचलो. हा निर्णय घेणे सोपे नव्हते. बऱ्याच दिवसांपासून याची प्रक्रिया होती. मनाला आजही यातना होत आहेत. पण एक मात्र नक्की यशंवत जाधव आणि यामिनी जाधव यांनी शिवसेना सोडून दुसरा कोणताही जॉईन केलेला नाही.

कॅन्सरच्या ज्या अवस्थेमध्ये भायखळा विधानसभेने जे आम्हाला समजून घेतले, किंबहुना भायखळा विधानसभेचा इतिहासच शिवसैनिकांनी घडवलेला आहे. त्याच शिवसैनिकांनी आम्हाला समजून घेणे गरजेचे आहे. यामिनी जाधव आणि यशवंत जाधव शिवसेनेविरुद्ध कधीही जाणार नाहीत, बेईमानी करणार नाहीत. काहीतरी कारण त्यामागे असेल, हे शोधण्याची आज गरज आहे, असे म्हणतं त्यांनी शिवसैनिकांनी आपल्याला समजून घ्यावे अशी इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

हे ही वाचा:

National Film Awards : अजय देवगण, आशा पारेखसह ‘१६’ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार घोषित

नोएडातील ओमॅक्स सोसायटी पुन्हा एकदा चर्चेत, अवैध बांधकामावर केली कारवाई

Follow Us

 

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss