राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Nationalist Congress leader Chhagan Bhujbal) आणि अन्य दोघांवर मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेंबूर येथील एका व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्त्याने गुन्हा दाखल केला आहे. छगन भुजबळ यांच्यासह अन्य दोघांविरोधात धमकी दिल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्या अडचणी थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. चेंबूर येथील एका रहिवाशाला मारण्याची धमकी दिल्यानंतर त्या व्यक्तीने चेंबूर येथील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानंतर त्यांच्यावर IPC सेक्शन ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Maharashtra | NCP leader Chhagan Bhujbal & 2 others booked under IPC sec 506 after a Chembur resident gave complaint at the Chembur police station alleging Bhujbal & others threatened to kill him for forwarding 2 videos to Bhujbal in which he was speaking against Hindu religion
— ANI (@ANI) October 1, 2022
ललितकुमार टेकचंदानी ४९ यांनी चेंबूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम ५०६ (२) (धमकी देणे) आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टेकचंदानी यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, त्यांनी छगन भुजबळ यांना त्यांच्या मोबाईलवर दोन व्हिडिओ पाठवले होते. ज्यात भुजबळांनी हिंदू धर्माचा अपमान करणारे भाषण केले होते. व्हिडिओ पाठवल्यानंतर लगेचच टेकचंदानी यांना धमक्या देणारे व्हाट्सअँप कॉल्स आणि मेसेज येऊ लागले. ज्यात त्यांना शिवीगाळ सुद्धा घेण्यात आली आहे. ‘तू भुजबळ साहेबांना संदेश पाठवतो, तुझा घरी येऊन गोळ्या टाकतो. मी दुबईची लोकं लावतो, भुजबळ साहेबांना मेसेज करणं महागात पडेल’, अशा शब्दात टेकचंदानी यांना धमक्या देण्यात आल्या असल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. दरम्यान, टेकचंदानी यांना हे संदेश आणि कॉल कुणी केले यांचा पोलीस तपास करत आहे. टेकचंदानी यांनी त्याला आलेल्या मोबाईल नंबरची माहिती पोलिसांना दिली असून पोलीस पुढील तपास करत आहे.
दरम्यान, शेअर करण्यात आलेल्य व्हिडिओत छगन भुजबळ हिंदू धर्माविरोधात बोलत असून हा व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी या व्यक्तीला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.
काय म्हणाले होते छगन भुजबळ –
‘शाळांमध्ये फुले, आंबेडकर, शाहू, कर्मवीर भाऊराव पाटील यांचे फोटो लावले पाहिजेत. कारण त्यांनी शिक्षणाचा अधिकार दिला. परंतु, सरस्वतीचा फोटो, शारदा मातेचा फोटो लावतात. जिला आम्ही कधी पाहिलं नाही. त्यांची पूजा कशासाठी करायची?, असे वादग्रस्त वक्तव्य भुजबळ यांनी केले होते. महापुरुषांमुळे तुम्हा आम्हाला शिक्षण मिळालं, त्यांची पूजा करायला हवी..यांच्या विचारांची पूजा झाली पाहिजे’, असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं होतं. सरस्वती विषयाचं राजकारण का केलं जातंय? मी देखील हिंदूच आहे, असं भुजबळांनी नंतर स्पष्टीकरण दिलं होतं.
हे ही वाचा:
Gujrat Boat in Pakistan Coustody : भारताच्या २ बोटी पाकिस्तानच्या ताब्यात
5G in India : आजपासून इंटरनेट सुस्साट… जाणून घ्या संपूर्ण माहिती