spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

उद्धव ठाकरेंचे ‘विश्वासू’ देखील शिंदे गटात जाणार ?

राज्यात सध्या अनेक दिवसांपासून शिंदे गट वीरुष ठाकरे गट यांच्यात सत्तासंघर्ष सुरु आहे. ‘खरी शिवसेना कोण’ यावरुन शिंदे गट आणि उद्धव ठाकरें या दोन्ही गटामध्ये वाद सुरु असताना दोन्ही बाजूंनी दावे-प्रतिदावे केले जात आहेत. दुसरीकडे,

राज्यात सध्या अनेक दिवसांपासून शिंदे गट वीरुष ठाकरे गट यांच्यात सत्तासंघर्ष सुरु आहे. ‘खरी शिवसेना कोण’ यावरुन शिंदे गट आणि उद्धव ठाकरें या दोन्ही गटामध्ये वाद सुरु असताना दोन्ही बाजूंनी दावे-प्रतिदावे केले जात आहेत. दुसरीकडे, शिंदे गट आणि शिवसेनेत मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेशदेखील होत आहेत. यासर्व पार्शवभूमीवर शिंदे गटातील आमदार गुलाबराव पाटील यांनी एक मोठे वक्तव्य करून मोठा धक्काच दिला आहे.

आपली बाजू भक्कम आहे असं दाखवण्याचा सध्या दोन्ही गटांकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न होत आहे. नुकतंच बाळासाहेब ठाकरेंचे सेवक चम्पासिंग थापा यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने शिवसेनेला धक्का बसला आहे. त्यातच आता शिंदे गटातील आमदार गुलाबराव पाटील यांनी धुळ्यातील सभेत एक हा मोठा दावा केला आहे. तेव्हा ते म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांचे सेवक चम्पासिंग थापा यांच्यानंतर आता उद्धव ठाकरेंचे स्वीय्य सहाय्यक मिलिंद नार्वेकरदेखील शिंद गटात सहभागी होतील असा दावा गुलाबराव पाटील यांनी केला आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सेवेकरी म्हणून ओळखले जाणारे चम्पासिंग थापा यांनीही उद्धव ठाकरे यांची साथ सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला आहे. एकेकाळी मातोश्रीमधील एक सदस्य म्हणून ओळख असलेल्या थापा यांनी घेतलेल्या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या असुन, उद्धव ठाकरेंसाठी हा एक धक्का मानला जात आहे. याचबरोबर बाळासाहेबांचे सेवेकरी असलेले मोरेश्वर राजे यांनीही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सेवेकरी म्हणून चम्पासिंग थापा हे ओळखले जातात. बाळासाहेब हे राज्यात दौरे किंवा सभेनिमित्त जायचे, त्यावे‌ळेस त्यांच्यासोबत थापा हे सावलीसारखे उभे असायचे. बाळासाहेबांच्या प्रकृतीची काळजी घेणे, त्यांना औषधे देणे आणि जेवण देणे अशी कामे ते करीत होते. मातोश्रीमधील एक सदस्य म्हणून ते ओळखले जायचे. बाळासाहेब यांच्या निधनानंतर थापा यांनी मातोश्रीसोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. असे असतानाच, त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाण्यातील टेंभीनाका येथील देवीच्या मिरवणुकीदरम्यान भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला.

“गुलाबराव पाटलांनी ५० खोके घेतले मान्य आहे. पण चम्पासिंग थापाने काय केलं? ज्या थापाने त्याचं संपूर्ण आयुष्य बाळासाहेबांच्या चरणी अर्पण केलं होतं, तोदेखील यांना सोडून आला. यांनी आता टीका करायची तरी कशी. थापा गेला, आता मिलिंद नार्वेकर येत आहेत,” असं गुलाबराव पाटील म्हणाले आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतरही मिलिंद नार्वेकर यांच्यासोबत मात्र त्यांचा संवाद कायम आहे. एकनाथ शिंदे गणेशोत्सवात मिलिंद नार्वेकर यांच्या घरी दर्शनासाठी पोहोचले होते. एकनाथ शिंदे सूरतमध्ये असताना उद्धव ठाकरेंनी चर्चेसाठी ज्यांना पाठवलं होतं, त्यामध्ये मिलिंद नार्वेकर यांचा समावेश होता.

हे ही वाचा:

Chhagan Bhujbal: छगन भुजबळांवर गुन्हा दाखल

Raj Thackeray : राज ठाकरे शिर्डी विमानतळावर दाखल

Gujrat Boat in Pakistan Coustody : भारताच्या २ बोटी पाकिस्तानच्या ताब्यात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss