spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

चांदणी चौकातील पुल रविवारी पाढणार, शनिवारी रात्रीपासूनच वाहतुक बदल

चांदणी चौकातील पूल पाढण्याच्या कामाला काही दिवसांपासून वेग आला आहे. चांदणी चौकातील पुल पाडण्याचे काम रविवारी पहाटेच्या सुमारास होणार असल्याने शनिवारी रात्रीपासूनच वाहतुक बदल करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतुक शाखेने केले आहे. शनिवारी रात्री ११ वाजल्यापासून रविवारी सकाळी ८ वाजेपर्यंत महामार्गावरील वाहतुक बंद ठेवण्यात आली आहे. (Chandni Chowk bridge work Change in traffic rules)

जर तुम्हाला आज रात्री प्रवास करायचा असेल तर पर्यायी मार्ग समजून घ्या. सोलापूर रस्त्याने येऊन हडपसर मार्गे मुंबईकडे जाणाऱ्या जड वाहनांनी चौफुला, केडगाव, पारगाव नाव्हरे फाटा, नगर रोड, शिक्रापूर चाकण, तळेगाव मार्गे पुढे जावे. चौफुला ते थेऊर फाटा दरम्यान येणारी जड वाहने हडपसर गाडीतळ मगरपट्टा चौक, उजवीकडे वळून मुंढवा चौक, खराडी बायपास, डावीकडे वळून नगर रोडने पुढे जुना पुणे मुंबई महामार्गाचा वापर करावा.

सासवड रोडने कात्रज मार्गे मुंबईकडे जाणारी जड वाहतूक मंतरवाडी फाटा येथुन डावीकडे न वळता सरळ हडपसर गाडीतळ मगरपट्टा चौक, उजवीकडे वळून मुंढवा चौक, खराडी बायपास, डावीकडे वळून नगर रोडने पुढे जुना पुणे मुंबई महामार्गाचा वापर करतील. सासवड रोडने मुंबईकडे जाणारी हलकी व प्रवासी चारचाकी वाहने मंतरवाडी फाटा, कात्रज चौक, उजवीकडे वळून जेधे चौक डावीकडे वळून सारसबाग, पुरम चौक, डावीकडे वळून टिळक रोडने खंडोजीबाबा चौक, फर्ग्युसन रोडने वीर चाफेकर चौक, डावीकडे वळून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक, राजीव गांधी पुलावरुन औंध, वाकड रोडने वाकड चौक, डावीकडे वळून पुढे मुंबई महामार्गाने पुढे जातील

सोलापूर रोडने मुंबईकडे जाणारी हलकी व प्रवासी चारचाकी वाहने हडपसर गाडीतळ भैरोबानाला चौक, जेधे चौक, पुरम चौक, बाजीराव रस्ता, शनिवार वाडा, शिवाजीनगर, डावीकडे वळून विद्यापीठासमोरील चौकातुन औंध रोडने राजीव गांधी पुल, वाकड चौक किंवा शिवाजीनगर चौकातून उजवीकडे वळून इंजिनीअरींग कॉलेज चौक डावीकडे वळून जुना पुणे मुंबई महामार्गाचा वापर करतील. सोलापूर रोडने मुंबईकडे जाणारी हलकी वाहने हडपसर गाडीतळ भैरोबानाला चौक, उजवीकडे वळून मोरओढा चौक, सर्किट हाऊस चौक, आंबेडकर सेतु, चंद्रमा चौक, होळकर पुलावरुन पोल्ट्री फार्म चौक, उजवीकडे वळून जुना पुणे मुंबई महामार्गाचा वापर करतील.

हे ही वाचा:

कोस्टल रोडला सुप्रीम कोर्टाचा ‘ग्रीन सिग्नल’

टीम इंडियासाठी खुशखबर; ‘हा’ खेळाडू खेळणार विश्वचषकात !

Follow Us

Latest Posts

Don't Miss