spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

माझं नाव खराब करण्याचा प्रयत्न ; भुजबळांनी आरोप फेटाळले

महाराष्ट्राचे माजी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि इतर दोघांविरुद्ध एका व्यक्तीला जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदारानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला एक व्हिडिओ फॉरवर्ड केला होता.

महाराष्ट्राचे माजी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि इतर दोघांविरुद्ध एका व्यक्तीला जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदारानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला एक व्हिडिओ फॉरवर्ड केला होता. ज्यामध्ये हिंदू धर्माविरुद्ध वक्तव्य केलं गेल्याचं अधिकाऱ्याचं म्हणणं आहे. या सर्व प्रकरणी माजी मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेतली आहे.

छगन भुजबळ यांनी धमकी दिल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. भुजबळ म्हणाले, माझं नाव खराब करण्याचा त्याचा प्रयत्न आहे. गेली १० वर्षे टेकचंदानींचं माझ्याशी वैर आहे. पण, मी त्याला कधीच कोणता फोन अथवा व्हाॅटसअँप मेसेज केला नाही. आम्ही त्याला फोन करण्याचा प्रयत्न केला, पण त्यानं तो फोन उचलला नाही. टेकचंदानीला मी कोणतीही जीवे मारण्याची धमकी दिली नसल्याचंही भुजबळांनी स्पष्ट केलं. सरस्वती प्रकरणावरुन मला बदनाम करण्याचा त्याचा प्रयत्न असल्याचंही त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

नेमके प्रकरण काय ?

हिंदू धर्माचा अपमान केल्याचं भाषण छगन भुजबळ यांना मोबाईलवरून दोन व्हिडिओ पाठवले होते, असं पीडित व्यावसायिक टेकचंदानी (Teckchandani) यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटलंय. व्हिडिओ पाठवल्यानंतर लगेचच टेकचंदानी यांना व्हॉट्सएप कॉल्स आणि मेसेजद्वारे धमक्या मिळू लागल्या, ज्यामध्ये त्यांना शिवीगाळही करण्यात आली, असा आरोप आहे.

या संदर्भात प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) शुक्रवारी रात्री उशिरा चेंबूर पोलिस ठाण्यात (Chembur Police Station) नोंदवण्यात आला, असं त्यांनी सांगितलं. “त्या व्यक्तीनं दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे, भुजबळ आणि इतर दोघांविरुद्ध भारतीय दंड संहिता (IPC) कलम ५०६ (२) (गुन्हेगारी धमकी) आणि ३४ (सामान्य हेतू) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे,” असंही अधिकाऱ्यानं आज सांगितलं.

हे ही वाचा:

एवढ्या खालच्या पातळीवर जाणारे कार्यकर्ते, शिवसैनिक नाहीत – दादा भुसे

आम्ही जगापेक्षा उच्च दर्जाची आणि अधिक परवडणारी 5G सेवा आणणार – नरेंद्र मोदी

चांदणी चौकातील पुल रविवारी पाढणार, शनिवारी रात्रीपासूनच वाहतुक बदल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss