spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘पुरुषार्थ हे पुस्तक उद्धव ठाकरेंना दिलं पाहिजे’ – नारायण राणे

भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. उगवत नाही, फुलत नाही, वास येत नाही असा चाफा मातोश्रीवर आहे, अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी केली आहे. मी इथे आलो आणि मला सत्कारच्या वेळी पुस्तक दिलं. मला पुरुषार्थ हे पुस्तक दिलं. हे पुस्तक मला नाही उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) दिलं पाहिजे, अशी टीका देखील नारायण राणे यांनी केली आहे. ते मुंबईत बोलत होते. अडीच वर्ष काय त्यांनी केलं? असा सवाल राणे यांनी केला.

काही दिवसांपासून रोज फक्त शिंदे आणि फडणवीस यांच्यावर टीका केली जात आहे. मी सांगेन की उत्तर देऊ नका, आपला वेळ वाया घालवू नका, कामं करा असा सल्ला देखील राणे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला. बाळासाहेब हे साहेब होते. साहेबांच्या नखाची सर देखील यांना नाही. कशाची सर देऊ यांना, कोळसाही म्हणू शकत नाही, असं नारायण राणे यांनी म्हटले आहे.

नारायण राणे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा १७ सप्टेंबरला वाढदिवस झाला. भारतीय जनता पक्षाने त्यांचा वाढदिवस एक दिवस नाही तर १५ दिवस विविध माध्यमातून साजरा केला. पंतप्रधान मोदींचं जागतिक कीर्तिचं व्यक्तिमत्व आहे. जगात त्यांचं कौतुक केलं जातं. कॅबिनेटला जेव्हा मी बसतो तेव्हा सर्व गोष्टी त्यांना माहित असतात. ते जेव्हा बोलत असतात तेव्हा वाटतं बघतच बसावं. मोदींना सर्व वर्गाची काळजी आहे. असे राणे यांनी म्हटले आहे.

राणे यावेळी म्हणाले की, मला एक वर्ष मंत्री होऊन झाले. मी सव्वा लाख उद्योजक तयार केले. महाराष्ट्रात मी ६० टक्के ठिकाणी जाऊन आलोय, असंही ते म्हणाले.

हे ही वाचा:

माझं नाव खराब करण्याचा प्रयत्न ; भुजबळांनी आरोप फेटाळले

आम्ही जगापेक्षा उच्च दर्जाची आणि अधिक परवडणारी 5G सेवा आणणार – नरेंद्र मोदी

Follow Us

Latest Posts

Don't Miss