spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Constipation : बद्धकोष्ठता दूर होण्यासाठी घरगुती उपाय

बद्धकोष्ठता हे एक सामान्य आजार आहे . पण त्याचे दुष्परिणाम भरपूर प्रमाणात असतात . ही अशी परिस्थिती आहे कि तिथे माणसांना शौच करताना मोठी अडचण येते . बद्धकोष्ठता असल्यास पोट दुखी , पोटाचे वेगवेगळे आजार उद्भवतात . त्यामुळे माणसाची चिडचिड होणे , कामात लक्ष न लागणे , थकवा येणे , पोट साफ न होणे , वारंवार टॉयलेटला होणे , टॉयलेट सीट वर तासंतास बसावे लागते आणि शौच करताना पोटाला सारखा दाब द्यावा लागतो . त्यामुळे पायदुखी , डोके दुखी होते . ज्या लोकांना बद्धकोष्ठताचा त्रास असतो तिलोक नेहमी त्रस्त असतात . तर आज आम्ही तुम्हाला या बातमीमधून बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत .

हे ही वाचा : अनियमित पाळीमुळे त्रस्त आहात? मग नियमित पाळी येण्यासाठी खा ‘हे’ पदार्थ

 

घरगुती उपाय –

बद्धकोष्ठता असल्यास जास्त पाणी पिणे . जास्त पाणी पिल्यास पचनक्रिया चांगली होते . बद्धकोष्ठता त्रास देखील कमी होतो

सुके आणि ओले अंजीर बद्धकोष्ठतेवर फारच गुणकारी आहेत. त्यातून शरीराला पुरेसे फायबर मिळते . बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी काही अंजीर दुधात मिक्सकरून पिणे . बाजारात मिळणारे अंजीर अखे खाणे .

आळशी मुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो .आळशी मध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते .आळशी तुम्ही अन्य अन्नधान्यासोबत एकत्र करून नाश्त्याला खाऊ शकता किंवा गरम पाण्यासोबत देखील खाऊ शकता .

लिंबाचे आरोग्यासाठी खूप उत्तम फायदे आहेत . सकाळी अनुषा पोटी लिंबू पाणी पिल्यास पोट साफ होण्यास मदत होते .

अधिक व्यायाम करणे .

 

सकाळी सकाळी उठल्यावर नारळ पाणी पिणे त्यामुळे तुम्हाला हलके वाटे .

बद्धकोष्ठताचा त्रास असल्यास तुम्ही कॉफीचे सेवन करू शकता . कॉफीमध्ये केफेन युक्त पदार्थ असते त्यामुळे बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत करते .

रात्री जेवणानंतर त्रिफळाचे चूर्ण घेणे त्यामुळे अन्न पचण्यास मदत होते . त्रिफळा चूर्ण हे आवळा , हरडा व बेहडा या तीन फळांपासून बनवलेले असते . हे चूर्ण रेचक असून त्यामुळे तुमचे पचन नियमित व शौच चांगली होते . चमचाभर त्रिफळा चूर्ण पाण्यासोबत रोज सकाळी रिकाम्या पोटी किंवा रात्री झोपताना घेतल्यास बद्धकोष्ठ्तेपासून आराम मिळतो .

हे ही वाचा :

कर्जाचे किती प्रकार आहेत ? जाणून घ्या

 

Latest Posts

Don't Miss