spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Maidaan : अजय देवगणच्या ‘मैदान’ची रिलीज डेट बदलली

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (actor Ajay Devgan) गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. अजयचे अनेक सिनेमे गेल्या काही दिवसांत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (actor Ajay Devgan) गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. अजयचे अनेक सिनेमे गेल्या काही दिवसांत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. सध्या अजय ‘मैदान’ (Maidaan) या सिनेमामुळे चर्चेत आहे. अजयच्या या सिनेमाची रिलीज डेट बदलण्यात आली असून आता हा सिनेमा १७ फेब्रुवारी २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘मैदान’ हा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित होऊ शकतो अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत होत्या. पण आता हा सिनेमा सिनेमागृहातच प्रदर्शित होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. झी स्टूडियोजचे निर्माते बोनी कपूर, आकाश चावला आणि अरुण जॉय सेनगुप्ताने मिळून या सिनेमाची निर्मिती केली आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी अजयच्या ‘दृष्यम २’ या सिनेमाचा टीझर आऊट झाला होता. आता ‘मैदान’ सिनेमाची नवी रिलीज डेट समोर आली आहे. ‘मैदान’ हा सिनेमा भारतीय राष्ट्रीय फुटबॉल संघाचे मॅनेजर सैयद अब्दुल रहीम यांच्या आयुष्यावर आधारित आहे. हा सिनेमा २३ जून २०२२ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार होता. पण आता सिनेमाची रिलीज डेट बदलण्यात आली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

‘मैदान’ हा सिनेमा १७ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अमित रवींद्रनाथ शर्मा यांनी ‘मैदान’ सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. अमित रवींद्रनाथ यांचा ‘बधाई हो’ हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

अजय देवगणचा ‘थॅंक गॉड’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात अजयसह सिद्धार्थ मल्होत्रा, रकुल प्रीत सिंहदेखील दिसून येणार आहे. इंद्र कुमारने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. रिलीजआधीच हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यातदेखील अडकला आहे. ‘थॅंक गॉड’, ‘मैदान’ सह अजयचे अनेक प्रोजेक्ट सध्या पाईपलाईनमध्ये आहेत.

हे ही वाचा:

रिलीज नंतर पहिल्याच दिवशी पोन्नियिन सेल्वन I होतोय ट्रोल बाहुबलीशी तुलना केल्यामुळे चाहते नाराज

शिवसेनेत नार्वेकरांमुळे कल्ला!

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss