spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

“उद्धव ठाकरेंना १९९६ सालीचं मुख्यमंत्री व्हायचं होतं,” सुरेश नवले यांचा गौप्यस्फोट

शिवसेनेचे (Shivsena) माजी मंत्री सुरेश नवले यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. १९९६ साली उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून आम्ही बाळासाहेब ठाकरे (यांची भेट घेतली. आणि उद्धवजी यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद द्यावे असा आग्रह केला असल्याचं ते म्हणाले. या सांगण्यामागचे मुख्य सूत्रधार हे देखील उद्धव ठाकरेच होते असंही त्यांनी स्पष्ट केलं. बीडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी हा गौप्यस्फोट केला.

सुरेश नवले माध्यमांशी बोलत होते. “१९९६ साली युती सरकारमध्येच उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं. त्यासाठी शिवसेनेच्या आमदारांनी बाळासाहेब ठाकरेंना भेटून तसा प्रस्ताव द्यावा, असे उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं. त्यानुसार आम्ही बाळासाहेब ठाकरेंकडे गेले होतो. तेव्हा बाळासाहेबांनी विचारलं होते, तुम्ही कोण्याच्या सांगण्यावरून आला आहात का? मात्र, महाविकास आघाडीच्या काळात उद्धव ठाकरेंची ती इच्छा पूर्ण झाली,” असेही सुरेश नवले यांनी स्पष्ट केलं.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या संबंधित वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले होते की, “मी मुख्यमंत्री झाल्यानंतर झाल्यानंतर उद्धव ठाकरे अचानक राजकारणात सक्रिय झाले. आपण मुख्यमंत्री झाल्याचं त्यांना पचलं नाही, त्यामुळेच त्यांच्या जवळच्या लोकांनी राजकारणात येण्याचा सल्ला दिला.”

१९९० आणि १९९५ मध्ये बीड विधानसभेसाठी शिवसेनेकडून राज्यातील सर्वात पहिला उमेदवार म्हणून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुरेश नवले यांचे नाव जाहीर केले होते. सुरेश नवले हे ठाकरे कुटुंबाच्या जवळ मानले जात होते. नवले हे त्यावेळी नारायण राणे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात. युती सरकारच्या कार्यकाळात ते शिवसेनेकडून मंत्रीही होते. दरम्यान, काही दिवासांपूर्वी सुरेश नवले यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

हे ही वाचा:

Maidaan : अजय देवगणच्या ‘मैदान’ची रिलीज डेट बदलली

‘पुरुषार्थ हे पुस्तक उद्धव ठाकरेंना दिलं पाहिजे’ – नारायण राणे

Follow Us

Latest Posts

Don't Miss