spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

फडणवीसांनी दिली नव्या प्रकल्पाची माहिती म्हणाले, इतक्या हजार कोटींची गुंतवणूक…

१८ हजार कोटी रुपयांची त्याठिकाणी गुंतवणूक अपेक्षित आहे. गडचिरोलीकरिता गेम चेंजर प्रकल्प असणार आहे.

गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गडचिरोली व वर्धा या दोन जिल्ह्यांचा दौरा करून बैठक घेतली. जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेतला. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, मेडिकल कॉलेज करायचं आहे. त्याकरिता जागेचा ताबा लवकर मिळाला पाहिजे. विद्यापीठाच्या जागेचा ताबा वेगानं मिळाला पाहिजे. या संदर्भातले आदेश दिले.

लोकप्रतिनिधींनी काही प्रश्न मांडले. सिंचनाचा प्रश्न मांडला. त्यालाही आम्ही गती देणार आहोत. त्याचं डिझाईन करणार आहोत. लवकरात लवकर मान्यता कशी देण्यात येईल, यासाठी प्रयत्न करणार आहोत. रस्त्याच्या प्रलंबित कामांना गती देण्याचा आमचा मानस आहे. एमआरआय मशिन नाही. ती लागली पाहिजे, यासाठी आदेश दिलेत. जेणेकरून रुग्णांना चंद्रपूरला जाण्याची आवश्यकता पडणार नाही.

कोनसरीला प्रकल्प करायचा आहे. गडचिरोलीतील खनीज बाहेर वाहून नेणं, हे आम्हाला चालणार नाही. त्याचं प्रोसेसिंग गडचिरोलीतचं झालं पाहिजे. स्थानिकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. पहिला टप्पा एप्रिलपर्यंत होईल. त्याच्या विस्तारालाही मान्यता देऊ. १८ हजार कोटी रुपयांची त्याठिकाणी गुंतवणूक अपेक्षित आहे. गडचिरोलीकरिता गेम चेंजर प्रकल्प असणार आहे. या प्रकल्पाच्या अडचणी दूर करू, असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.

खाण कॉरिडोर तयार करू. त्यावरून ती वाहतूक होईल. असा प्रयत्न करणार आहोत. त्याचे आराखडे तयार करू. दुर्घटना होतात, त्या आपल्याला टाळता येतील, असंही फडणवीस यांनी सांगितलं.विकासाच्या संदर्भात सर्व अधिकाऱ्यांना सूचित केलं. महाराष्ट्राचं सरकार गडचिरोलीच्या पाठीशी भक्कमपणे उभं आहे. गडचिरोलीचे प्रश्न सोडवून घेतले पाहिजे. मंत्रालय स्तरावरील प्रश्नांसंदर्भात बैठक घेऊन ते सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल.

मेडिकट्टाच्या संदर्भात महत्वाचा निर्णय घेतला आहे. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी पाण्यामध्ये जातात. त्यांच्या जमिनी ताब्यात घेण्याचे निर्देश दिले आहेत. जमिनी, त्यावरील झाडं आणि पॅकेज तयार करून जमिनी अधिग्रहित करू, असंही फडणवीस म्हणाले.

हे ही वाचा:

शिंदेगटाचे सर्व आमदार पडले नाहीत तर मी हिमालयात जाईन- चंद्रकांत खैरे

शिवसेनेत नार्वेकरांमुळे कल्ला!

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss