spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

भरली वांगी खास तुमच्यासाठी

वांग्याच्या काचऱ्या, भरलं वांगे देखील बनवू शकता . फायबर, पोटॅशियम, विटामिन हे घटक वांग्यात मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तुम्हाला हृदयविकारापासून लांब ठेवते.

थंडी पडायला सुरुवात झाली की खवय्यांना हटकून भरताच्या वांगीची आठवण येते. वांग्याचं भरीत सर्वांना खायाला खूप आवडते . मातीतली वांगी खूप चवदार असतात. वांगे हे भाजीपाल्यामध्ये सहजपणे उपलब्ध असते . वांग्या मध्ये अनेक प्रकारचे आयुर्वेदिक गुणधर्म असून वांग्याचे सेवन केल्याने बरेच आरोग्यदायी फायदे होतात . वांगी मधुमेह नियंत्रित आणि व्यवस्थापित करण्यासाठी देखील प्रभावी आहे. यामुळे उच्च फायबर आणि लो कार्बची मदत होते. वांगे भूक नियंत्रित करते. कारण वांग्यामध्ये भरपूर फायबर आणि बिया असतात त्यामुळे पोट बऱ्याच काळासाठी भरलेले राहते. वांग्याच्या काचऱ्या, भरलं वांगे देखील बनवू शकता . फायबर, पोटॅशियम, विटामिन हे घटक वांग्यात मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तुम्हाला हृदयविकारापासून लांब ठेवते. वांगी मध्ये भरपूर प्रमाणात निरलस असल्यास आरोग्यासाठी वांगी फायदेशीर ठरते .

भरली वांगी रेसिपी –

साहित्य-
  • छोटी वांगी ४-५,
  • बटाटे-१-२,
  • एक वाटी ओला नारळ,
  • शेंदण्याचा कुट,
  • कांदा,
  • चिंच,
  • गुळ,
  • गोडा मसाला
  • तिखट
  • मीठ,
  • कोथिंबीर,
  • तेल
  • जिरे
  • कडीपत्ता
कृती-

ओला नारळ, कांदा, शेंदण्याचा कुट, चिंच, गुळ, गोडा मसाला, तिखट, मीठ, कोथिंबीर हे सर्व एकत्र करून घ्यावे, वांग्याला मधोमध चिर पाडून त्यात हा मसाला भरावा. आता कढईत २ मोठे चमचे तेल गरम करून त्यात जिरे , कडीपत्ता घालणे. त्या फोडणीत मसाला भरलेली वांगी घालून त्याला वाफ आणावी. गरज असल्यास थोडे थोडे पाणी शिंपडावे. उरलेला मसाला वरून घालून घेणे . गरज असल्यास मीठ घालावे.

Latest Posts

Don't Miss