spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

संध्याकाळच्या चहा सोबत बनवा स्पेशल पालक चाट

पालक बाजारात सहजपणे उपलब्ध असते . तसेच पालकापासून आपण वेगवेगळे पदार्थ देखील बनवू शकतो .

पालक चाट हा सर्वांना आवडतो . आणि संध्याकाळच्या चहासाठी एक उत्तम नाश्ता आहे . तसेच पालक ही एक हिरवीगार पालेभाजी आहे आणि पालक आरोग्यासाठी खूप उत्तम आहे . पालक बाजारात सहजपणे उपलब्ध असते . तसेच पालकापासून आपण वेगवेगळे पदार्थ देखील बनवू शकतो . पालकापासून पालक डाळ , पालक चाट , पालक भाजी असे देखील पदार्थ बनवता येतात .

पालक चाट बनवण्यासाठी साहित्य –

– १ कप बेसन

– ७ ते ८ पालक पाने

– ४ चमचे दही

– २ चमचे कांदा (चिरलेला)

– २ चमचे टोमॅटो (चिरलेला)

– १ हिरवी मिरची

– २ टीस्पून चिंचेची चटणी

– २ टीस्पून पुदिन्याची चटणी

– १ टीस्पून बुंदी

– १ टीस्पून डाळिंबाचे दाणे

– १ टीस्पून शेव

– १/२ टीस्पून ओवा

– चिमूटभर काळे मीठ

– चिमूटभर जिरे

– चिमूटभर लाल तिखट

– चिमूटभर हळद

– १ टीस्पून मीठ

– २ कप पाणी

पालक चाट बनवण्याची कृती –

एका बाऊल मध्ये एक वाटी बेसन घ्या आणि त्यात मीठ, ओवा आणि पाणी घालून घ्या . आणि ते ,हसरं चांगले ढवळून घ्या . आवश्यक असल्यास आणखी पाणी घाला. त्यामध्ये हळद घालून पुन्हा मिक्स करा. पालकची पाने चांगले भिजवून घ्या. भिजवून घेतल्यानंतर त्यावर बेसनाचे मिश्रण लावून घ्या . तळण्यासाठी पॅनमध्ये ठेवा. तळलेली, कुरकुरीत पालकाची पाने एका प्लेटवर घ्या आणि त्यावर थोडे दही घाला. सर्व मसाले आणि चटण्या घ्या आणि त्यांच्याबरोबर डिश सजवा. त्यावर मसाले घाला, कांदा , टोमॅटो, हिरवी मिरची, चिंचेची चटणी आणि पुदिन्याची चटणी घालून घ्या.

हे ही वाचा:

उरलेल्या भातापासून बनवा हॉटेल सारखा फ्राईड राईस

लहानमुलांसाठी स्पेशल चहा सोबत बटाटे चिप्स

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss