spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Pune Chandani Bridge : अखेर चांदणी चौकातील पुल जमीनदोस्त पण, वाहतूक अजूनही बंदच

पुण्यातल्या वाहतूक कोंडीसाठी कारणीभूत ठरणारा चांदणी चौकातला पूल अखेर रात्री १ वाजून ७ मिनिटांनी जमीनदोस्त झाला. स्फोटानंतर पुलाजवळ काही वेळ केवळ धुळीचे लोटच पाहायला मिळत होते. हळूहळू धुळीचे लोट खाली बसले आणि चांदणी चौकातला पूल पडल्याचं चित्र समोर आलं. गेले अनेक दिवस पूल पाडण्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. पुलाला १ हजार ३०० छिद्र पाडून ६०० किलो स्फोटकं भरण्यात आली होती. जय्यत तयारी करून आणि सर्व खबरदारी घेऊन रात्री एक वाजल्यानंतर पूल पाडण्याचं काऊंटडाऊन सुरु झालं. आणि पुणेकरांची कोंडी करणारा हा पूल क्षणभरात उद्ध्वस्त झाला. पूल पाडल्यानंतर ढिगारे हटवण्याचं काम सुरु झालं. पहाटे पर्यंत ढिगारे हटवण्याचं काम पूर्ण होणार अशी खात्री जिल्हा अधिकारयांनी दिली होती. मात्र अद्यापही सकाळचे ९ वाजून गेले तरी ढिगारे हटवण्याचं काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे पर्यायी मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.

हेही वाचा : 

उपवासाठी खास ३ प्रकारचे पदार्थ; जाणून घ्या रेसिपी…

चांदणी चौकातील पुल जमीनदोस्त केल्यानंतर यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे की, पुण्याहून साताऱ्याकडे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या नागरिकांनी मला सांगितली होती. मी त्या भागाचा सर्व्हे केला, त्यानंतर एनएचआय, पीडब्लूडी अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. त्यानंतर तेथे वाहतूक कोंडीतून दिलासा देण्यासाठी चांदणी चौकातील पूल पाडण्याचा निर्णय घेतला होता. कंट्रोल ब्लास्टिंगने हा पूल पाडण्याचा निर्णय घेतला. आज तो पूल पाडण्यात आला, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.

वाहनचालक पर्यायी मार्ग देखील वापरू शकतात. सकाळी आठ वाजता वाहतूक सुरू होईल असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं होतं मात्र अद्याप वाहतूक सुरू झालेली नाही. पुल पाडल्यानंतर इथला मलबा उचलण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. टीपर, पोकलेन मशीन अनेक यंत्रसामग्रीने राडारोडा उचलण्याचे काम सुरू आहे.

भरली वांगी खास तुमच्यासाठी

वाहतुकीत बदल 

मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील मुंबईकडून येणारी जड वाहतूक ही ऊर्से टोलनाका येथेच थांबविण्यात येणार आहे. साताऱ्याकडून येणारी जड वाहतूक ही खेड शिवापूर टोलनाक्याजवळ थांबविण्यात येणार आहे. तर, मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील शिंदेवाडी ते ऊर्से टोलनाका या दरम्यान दोन्ही बाजूने सर्व प्रकारच्या जड वाहनांच्या वाहतुकीस बंदी करण्यात येणार आहे.आणि मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील डुक्कर खिंड ते पिंपरी चिंचवड आयुक्तालय हद्दीतील घोडावत चौक या दरम्यान दोन्ही बाजून सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीस बंदी राहिल.

फडणवीसांनी दिली नव्या प्रकल्पाची माहिती म्हणाले, इतक्या हजार कोटींची गुंतवणूक…

Latest Posts

Don't Miss