spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Pro Kabaddi League 2022 : प्रो कबड्डी लीग नव्या हंगामासाठी ‘या’ खेळाडूना कोणीही विकत घेतले नाहीत

प्रो कबड्डी लीगच्या नवव्या हंगामाचा लिलाव खूपच प्रेक्षणीय होता. पहिल्यांदाच एका खेळाडूसाठी दोन कोटी रुपये किंवा त्याहून अधिकची बोली लागली होती. पवन सेहरावतला खरेदी करण्यासाठी तमिळ थलायवासने २.२६ कोटी रुपये खर्च केले होते. पवन हा लीग इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. पवनशिवाय अन्य काही खेळाडूंनाही मोठी किंमत मिळाली आहे. मात्र, यादरम्यान काही दिग्गज खेळाडूंना कोणत्याही संघाने विकत घेतले नाही.

अजय ठाकूर या हंगामाच्या लिलावात सहभागी झाला नव्हता. अजयला फिटनेसची समस्या आहे त्यामुळे तो या लिलावाचा भाग नव्हता. मात्र, त्याच्याशिवाय काही दिग्गजांनीही या लिलावात भाग घेतला होता, मात्र त्यांच्या पदरी निराशाच पडली. चला तीन दिग्गज खेळाडूंवर एक नजर टाकूया ज्यांना कोणीही विकत घेतले नाही.

हेही वाचा : 

‘बिग बॉस’चा स्पिन-ऑफ शो ‘बिग बझ’ वूटवर लवकरच येणार, ‘हा’ विनोदी अभिनेता करणार शो होस्ट

रोहित कुमार

सहाव्या मोसमात बंगळुरू बुल्सला आपल्या कर्णधारपदाने चॅम्पियन बनवणारा रोहित कुमार विकला गेला नाही. नवव्या मोसमात रोहितला कोणत्याही संघाने विकत घेतले नाही. अष्टपैलू रोहित गेल्या मोसमात तेलुगू टायटन्सचा कर्णधार होता. तथापि, त्याने आठ सामन्यांत केवळ १२ रेड पॉईंट्स मिळवले आणि संपूर्ण हंगामात तंदुरुस्तीसाठी संघर्ष केला.

संदीप नरवाल

लीगमधील सर्वात मोठ्या अष्टपैलू खेळाडूंपैकी एक असलेल्या संदीप नरवालचीही लिलावात निराशा झाली. दबंग दिल्लीसोबत गेल्या मोसमात संदीप चॅम्पियन बनला होता, पण या मोसमात तो लीगचा भाग असणार नाही. संदीपने लीगमध्ये आतापर्यंत ६२३ गुण घेतले आहेत, त्यापैकी ३४८ बचावात आले आहेत. त्याच्यासारखा खेळाडू न विकला जाणे ही धक्कादायक बाब होती.

सचिन वाझे दर महिन्याला मातोश्रीवर १०० कोटी पाठवायचे, शिंदे गटाचा गंभीर आरोप

रिशांक देवाड़िगा

यूपी योद्धाचे कर्णधार असलेल्या रिशांक देवाडिगाला या हंगामात कोणत्याही संघाने विकत घेतले नाही. गेल्या मोसमात बंगाल वॉरियर्सचा भाग असलेल्या रिशांकने आठव्या सत्रात केवळ एकच सामना खेळला होता. गेल्या तीन हंगामात रिशांकच्या कामगिरीत घसरण झाली होती आणि त्यामुळेच कदाचित कोणत्याही संघाने त्याच्यावर बाजी मारली नाही.

PKL मधील आतापर्यंतचे विजेते:

सीझन १ (२०१४) – जयपूर पिंक पँथर्स
सीझन २ (२०१५) – यू मुंबा
सीझन ३ (२०१६) – पाटणा पायरेट्स
सीझन ४ (२०१६) – पाटणा पायरेट्स
सीझन ५ (२०१७) – पाटणा पायरेट्स
सीझन ६ (२०१८) – बेंगळुरू बुल्स
सीझन ७ (२०१९) – बंगाल वॉरियर्स
सीझन ८ (२०२२) – दबंग दिल्ली

मुंबईत शिवसेनेला खिंडार, आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातील ५०० कार्यकर्त्यांचा शिंदेंना पाठिंबा

Latest Posts

Don't Miss