spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

आता मला काळजी एवढीच आहे की या धक्क्यांमधून उद्धव ठाकरेंची शिवसेना किती …. -नारायण राणे

भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा आज शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. वरळीतील शेकडो शिवसैनिकांनी आज(रविवार) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय निवासस्थान ‘वर्षा’ येथे दाखल होत, शिंदे गटात प्रवेश केला. एवढ्या मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांचा शिंदे गटात झालेला प्रवेश हा शिवसेना नेते आदित्य ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे. कारण, आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातच शिवसैनिकांनी ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंचे नेतृत्व स्वीकरल्याने आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंसाठी ही काहीशी चिंतेची बाब म्हणावी लागणार आहे. दसम्यान, या घटनेवर भाजपा नेते व केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी आज वर्धा येथे पत्रकारपरिषदेत बोलताना प्रतिक्रिया दिली. “शिंदे गट बरेचसे धक्के शिवसेनेला देत आहे, आता मला काळजी एवढीच आहे की या धक्क्यांमधून उद्धव ठाकरेंची शिवसेना किती स्वत:ला सांभाळू शकेल हा प्रश्न आहे. पण शिवसेनेचा अस्त जवळ आला आहे.” असं नारायण राणे यांनीबी यावेळी म्हटलं आहे.

शिवसेनेतून बंड करून शिंदे गटात सामील झालेले खासदार प्रतापराव जाधव यांनी आज उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. सचिन वाझे यांच्याकडून मातोश्रीवर दर महिन्याला १०० खोके जात होते, असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. यावरही नारायण राणेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

“माझ्याकडे काही पुरावे नाहीत, मी काय त्याल दुजोरा देणार नाही. तुम्हाला दुजोरा दिला आणि परत कोर्ट-कचऱ्या हे सर्व नको. ते साक्षीदार असतील त्यांना माहीत असेल, खोके किती प्रमाणावर जात होते. मातोश्रीला खोके आणि शिवसैनिकाला काही नाही. पिशव्या खाली पिशव्या. म्हणूनच हे ४० जण बाहेर पडले.” असं नारायण राणे म्हणाले आहेत.

हे ही वाचा:

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी, वर्षा बंगल्यावर व ठाण्यातील निवास्थानी सुरक्षा वाढवली

पाहताच थक्क व्हाल असा गुजरातमधील शेकडो लोक गरबा करतानाचा ड्रोन शॉट व्हिडिओ होतोय व्हायरल

Follow Us

Latest Posts

Don't Miss