Saturday, September 28, 2024

Latest Posts

देशात राहायचं असेल तर वंदे मातरम् म्हणावेच लागेल- गुलाबराव पाटील

राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज ‘हॅलो नव्हे, तर वंदे मातरम्’ या अभियानाची सुरुवात झाल्याची घोषणा केली. यासंदर्भात कालच शासन निर्णय देखील निघाला आहे. राज्यातील सरकारी अधिकारी-कर्मचारी यांना सरकारी कार्यालयात त्यांचे सहकारी कार्यालयात येणारे अभ्यागत यांच्याशी दूरध्वनी अथवा मोबाइल आदींवर किंवा बैठकीत संवाद साधताना ‘हॅलो’ या शब्दाऐवजी ‘वंदेमातरम’ असे संबोधावे, असे राज्य सरकारतर्फे सांगण्यात आले आहे. दरम्यान, आता मंत्री गुलाबराव पाटील यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. ”देशात राहायचं असेल तर वंदे मातरम् म्हणावेच लागेल”, असे ते म्हणाले.

भुसावळ तालुक्यातील कंडारी, फुलगाव, कोठोरा व कठोरा बुद्रुक या चार गावाच्या १३ कोटी रुपये पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन आज पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गुलाबराव पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ”ज्या मातीत तुम्ही राहता, त्या मातीला तुम्ही नमन केले पाहिजे. देशात राहायचे असेल तर वंदे मातरम म्हणावे लागेल. वंदे मातरम म्हणणे काही चुकीचे नाही, अशी प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. ”महाराष्ट्रातील जवळपास १७ हजार गावं आहेत. त्या गावातील पाणीपुरवठा योजनेच्या बीपीआर मंजूर करून त्यांना मंजुरी देण्यात आले आहे. २०२४ पर्यंत महाराष्ट्रातील एकही गाव पाण्यापासून वंचित राहणार नाही, हे धोरण ठरलेला आहे, त्या धोरणाप्रमाणे पहिला टप्पा आता पूर्णत्वास येत आहे”, असेही ते म्हणाले.

राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज ‘हॅलो नव्हे, तर वंदे मातरम्’ या अभियानाची सुरुवात झाल्याची घोषणा केली. यासंदर्भात कालच शासन निर्णय देखील निघाला आहे. आज वर्ध्यात बोलताना मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, काहींना प्रश्न पडला असेल जर आम्हाला जय महाराष्ट्र, जय भवानी, जय भीम किंवा जय श्री राम म्हणायचे असेल तर काय. तर त्यांना तसे ही बोलता येणार. कोणाला आई वडिलांचा नाव घ्यायचे असेल तरी चालेल, मात्र हॅलो बोलू नका. वंदे मातरम आपण सर्वांना प्राण प्रिय आहे. जर ते प्राण प्रिय असेल तर वंदे मातरम् म्हणा, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. ‘हॅलो नव्हे, तर वंदे मातरम्’ या अभियानाच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. शासकीय कार्यालयांमध्ये आणि इतरही सर्व नागरिकांनी दूरध्वनी किंवा भ्रमणध्वनीवर बोलण्याची सुरुवात करताना ‘हॅलो नव्हे, तर वंदे मातरम्’ म्हणा, या राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी अभियानाचा शुभारंभ आज गांधी जयंती दिनी, त्यांचीच भूमी म्हणजे वर्धा येथून झाली.

हे ही वाचा:

आता मला काळजी एवढीच आहे की या धक्क्यांमधून उद्धव ठाकरेंची शिवसेना किती …. -नारायण राणे

पाहताच थक्क व्हाल असा गुजरातमधील शेकडो लोक गरबा खेळतानाचा ड्रोन शॉट व्हिडिओ होतोय व्हायरल

Follow Us

Latest Posts

Don't Miss