spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

आदिपुरुष मेगा टीझर रिव्हल’च्या आधी चाहत्यांची उत्सुकतेमुळे ट्विटरवर विनोदी मिम्स होतायत ट्रेंड

भूषण कुमार, ओम, प्रसाद सुतार आणि राजेश नायर निर्मित हा चित्रपट हिंदी, तेलगू, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे.

अखेर प्रभास आणि सैफ अली खानच्या चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे कारण निर्माते आदिपुरुषचा पहिला टीझर रिलीज करणार आहेत. २०२२ च्या गांधी जयंती निमित्त, निर्माते उत्तर प्रदेशातील अयोध्येच्या पवित्र भूमीत सरयूच्या काठावर व्हिडिओचे अनावरण करणार आहेत. सुपरस्टार प्रभास, क्रिती यांच्यासह दिग्दर्शक ओम राऊत आणि निर्माता भूषण कुमार यांच्या उपस्थितीत हा भव्य कार्यक्रम रंगणार आहे. मोठ्या रिलीजच्या अगोदर, चाहते सोशल मीडियावर त्यांचा उत्साह शेअर करत आहेत.

मायक्रो-ब्लॉगिंग साइटवर ‘आदिपुरुष मेगा टीझर रिलीज’ हा टॉप ट्रेंड बनला आहे आणि नेटिझन्स त्यांच्या अपेक्षेबद्दल ट्विट करत आहेत, मजेदार मीम्स आणि ते किती अधीर आहेत याबद्दलचे विनोद आणि बरेच काही सध्या इंटरनेटवर ट्रेंड होत आहे. इंटरनेटवर आदिपुरुष ट्रेलर लीक झाल्याच्या बातम्या समोर आल्याने, नेटिझन्सनी सर्वांना विनंती केली की त्यांनी चाहत्यांचा अनुभव खराब करू नये.

हा चित्रपट रामायणावर आधारित असून, वाईटावर चांगल्याचा विजय होतो असा संदेश या चित्रपटातून देण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशातील हे धार्मिक शहर प्रभू रामाचे जन्मस्थान देखील आहे, जे या कार्यक्रमासाठी अगदी योग्य स्थान आहे.

चित्रपटात प्रभास रामची भूमिका साकारणार असून सनी लक्ष्मणच्या भूमिकेत दिसणार आहे. क्रिती आगामी चित्रपटात सीतेची भूमिका साकारणार असून सैफ रावणाची भूमिका साकारणार आहे. आदिपुरुष हा ओम राऊत दिग्दर्शित टी सीरीज आणि रेट्रोफिल्स द्वारे निर्मित मेगा भारतीय चित्रपट असून तो १२ जानेवारी २०२३ रोजी IMAX आणि 3D मध्ये प्रदर्शित होणार आहे. भूषण कुमार, ओम, प्रसाद सुतार आणि राजेश नायर निर्मित हा चित्रपट हिंदी, तेलगू, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे.

हे ही वाचा:

पाहताच थक्क व्हाल असा गुजरातमधील शेकडो लोक गरबा खेळतानाचा ड्रोन शॉट व्हिडिओ होतोय व्हायरल

Pro Kabaddi League 2022 : प्रो कबड्डी लीग नव्या हंगामासाठी ‘या’ खेळाडूना कोणीही विकत घेतले नाहीत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss