spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

नितीश कुमारांच्या मंत्रिमंडळाती कृषिमंत्री सुधाकर सिंह यांचा राजीनामा

बिहारची राजधानी पाटणा (Bihar Patna) येथून मोठी बातमी समोर येत आहे. बिहार सरकारमधील कृषी मंत्री आणि आरजेडी आमदार सुधाकर सिंह (Sudhakar Singh) यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिलाय. गेल्या काही दिवसांपासून बिहारच्या राजकारणात आपल्या वक्तव्यांमुळं चर्चेत असलेल्या सुधाकर सिंह यांनी बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांच्याकडं आपला राजीनामा सुपूर्द केला आहे.

‘काँग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये खुली चर्चा व्हायला हवी’, शशी थरूर यांचे मल्लिकार्जुन खरगे यांना आव्हान

सुधाकर सिंह त्यांच्या एका वक्तव्यामुळं बिहारमध्ये वाद निर्माण झाला होता. सुधाकर सिंह यांनी कैमूरमधील सभेत बोलताना कृषी विभागात अनेक चोर आहेत, त्या चोरांचा मी सरदार आहे, माझ्यापेक्षा वरच्या पातळीवर आणखी चोर आहेत, असं सुधाकर सिंह म्हणाले. नितीश कुमार यांनी मंत्रिमंडळ बैठकीत सुधाकर सिंह यांना जाब विचारला होता. मात्र, कृषीमंत्र्यांनी वक्तव्यावर ठाम असल्याचं म्हटलं होतं. काही अडचण असेल तर राजीनामा घ्यावा, असं सिंह म्हणाले होते. गेल्या महिन्यात कृषीमंत्री सुधाकर सिंह यांच्या वकत्व्यानंतर राजकारण मोठ्या प्रमाणावर सुरु झालं होतं. विरोधी पक्षांनी सुधाकर सिंह यांच्या वक्तव्यावरुन नितीशकुमार यांच्या सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. नितीशकुमार यांनी सुधाकर सिंह यांना सार्वजनिक ठिकाणी वक्तव्य करताना सतर्कता बाळगण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, सुधाकर सिंह यांनी ते त्यांच्या मतावर ठाम असून आवश्यकता असल्यास राजीनामा घ्या, असं प्रत्युत्तर दिलं होतं.

कृषिमंत्री सुधाकर सिंह हे बिहार आरजेडीचे (RJD) प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह यांचे पुत्र असल्याची माहिती आहे. नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या सरकारमध्ये त्यांना कृषिमंत्री करण्यात आलं. सुधाकर सिंह यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिल्याच्या वृत्ताला त्यांचे वडील आणि आरजेडीचे प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह यांनी दुजोरा दिलाय. सुधाकर सिंह यांनी बीज महामंडळ शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी १०० ते १५० कोटी रुपयांची चोरी करत असल्याचं म्हटलं. कॅबिनेट बैठकीनंतर सुधाकर सिंह यांना विचारलं असता मी नाराज नसून बैठकीतून निघालो आहे, असं ते म्हणाले होते. सुधाकर सिंह यांनी लालू प्रसाद यादव आणि तेजस्वी यादव हे माझे नेते असल्याचं म्हटलं होतं.

महागठबंधन सरकारमध्ये सुधाकर सिंह आरजेडी कोट्यातून मंत्री झाल्याची माहिती आहे. सुधाकर सिंह यांनी आपल्याच सरकारविरोधात बंड पुकारलं होतं. सुधाकर सिंह यांनी खुल्या व्यासपीठावरून बिहार सरकारच्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना चोर म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरून बराच गदारोळ झाला होता. आज त्यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला.

हे ही वाचा:

Bharat Jodo Yatra : ‘भारत जोडो’ यात्रेला मिळणा-या प्रचंड प्रतिसादाने भाजपाचे संतुलन बिघडले : नाना पटोले

BSNL 5G ने वाढवणार Airtel-Jio चे टेन्शन, स्वस्त प्लॅन्ससह या दिवशी सेवा सुरू होणार

Follow Us

Latest Posts

Don't Miss