spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Dasara Melava : दसरा मेळाव्याची जोरदार तयारी; ठाकरे गटाकडून दादर, वरळी परिसरात बॅनरबाजी

शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला आता अवघा एकच दिवस शिल्लक आहे. या दसऱ्या मेळाव्यावरून कित्येक दिवस शिवसेनेचा ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात वाद सुरु होते.

शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला आता अवघा एकच दिवस शिल्लक आहे. या दसऱ्या मेळाव्यावरून कित्येक दिवस शिवसेनेचा ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात वाद सुरु होते. हा वाद कोर्टातही पोहोचला होता. अखेर हायकोर्टाने ठाकरे गटाला शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याची परवानगी दिली. आता मेळाव्यासाठी जय्यत तयारी सुरु आहे. या दसरा मेळाव्यापूर्वी शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून (Thackeray Group) मुंबईतील (Mumbai) दादर, वरळी परिसरात बॅनरबाजी करण्यात आली आहे.

आपलाच दसरा मेळावा मोठा व्हावा यासाठी शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाचे प्रयत्न सुरु आहेत. दसरा मेळावा शिंदे गटापेक्षा मोठा व्हावा यासाठी आता महाविकास आघाडीती मित्रपक्ष असणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस देखील सरसावले आहेत. या मेळाव्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे अप्रत्यक्षरीत्या ठाकरे गटाला मदत करणार असल्याची माहिती आहे. त्याचाच भाग म्हणून राष्ट्रवादीचे बॅनर्स पाहायला मिळत आहेत. दसरा मेळाव्याला राज्यभरातून शिवसैनिक मुंबईत येण्यासाठी एसटीसोबत मोठ्या प्रमाणावर खाजगी बस दोन्ही गटांकडून बुक करण्यात आल्या आहेत. परिणामी दसऱ्याच्या दिवशी मुंबईत मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. दोन्ही गटाकडून साडेतीन हजारच्या जवळपास खाजगी बसेस बुक करण्यात आले आहेत. शिवाय एसटी बसचा हा आकडा सुद्धा हजारांच्या जवळपास असल्याची माहिती आहे.

शिवसेनेच्या ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार आहे. तर शिंदे गटाचा वांद्रे कुर्ला संकुलात अर्थात बीकेसीमध्ये होणार आहे. महाविकास आघाडीचे मित्रपक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून देखील या मेळाव्यासाठी शुभेच्छा देणारे बॅनर पाहायला मिळत आहेत. त्यामुळे मेळाव्यापूर्वी ठाकरे गटाकडून वातावरण निर्मिती केली जात असल्याचं चित्र आहे. दसरा मेळाव्याकरता शिवसेनेच्या शाखांमधली तयारी पूर्ण झाली आहे. विशेषत: दादर, प्रभादेवीमधील शिवसेनेच्या शाखांवर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शिवाजी पार्क परिसरात अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी शिवसेनेचे पदाधिकारीही घेणार आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आलेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांनाही पदाधिकाऱ्यांकडून शांतता पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

हे ही वाचा:

Navratri 2022 : मुलुंडमध्ये गरबा खेळताना तरुणांचा दुर्दैवी मृत्यू

Comrade Kumar Shiralkar : आदिवासी, शेतमजूरांचा आवाज हरपला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss