spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

PFI : पीएफआयचा मोठा कट उघडकीस

काही दिवसांपूर्वी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यालयावर तपास यंत्रणांनी देशभरात छापेमारी केली होती. दोन टप्प्यात केलेल्या या कारवाईत पीएफआयच्या अनेक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. त्याशिवाय, त्यांच्या कार्यलयातून महत्त्वाचे दस्ताऐवजही जप्त करण्यात आले होते. या कारवाईनंतर केंद्र सरकारने पीएफआयवर पाच वर्षांसाठी बंदी घातली. एनआयएने केलेल्या कारवाईत महाराष्ट्र एटीएसचा सहभाग होता. एटीएसच्या तपासात महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) आणि महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर (PFI) केलेल्या कारवाईत महत्त्वाचे धागेदोरे समोर आले आहेत. महाराष्ट्र एटीएसला औरंगाबादमधून अटक केलेल्या पीएफआय कार्यकर्त्यांकडून महत्त्वाची माहिती मिळाली आहे. मराठवाड्यात शारिरीक प्रशिक्षणाच्या नावाखाली दहशतवादाचे प्रशिक्षण दिले जात असल्याचे एटीएसच्या तपासात समोर आले आहे.

एटीएसने अटक केलेल्या कार्यकर्त्यांनी औरंगाबादेतील पडेगाव, नारेगावसह बीड आणि जालना येथे शारिरीक प्रशिक्षणाच्या नावाखाली दहशतवादाचे प्रशिक्षण दिले जात असल्याचे एटीएसला आढळून आले आहे. हे प्रशिक्षण एका बंद शेडमध्ये देण्यात येत होते. त्याशिवाय, अटकेत असलेल्या आरोपींच्या वेगवेगळ्या बँक खात्यातून अनेक मोठे आर्थिक व्यवहार झाल्याचा दावा एटीएसने न्यायालयात केला आहे.

रविवारी विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. एल. मोरे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. शेख इरफान शेख सलीम ऊर्फ मौलाना इरफान मिल्ली (वय ३७, रा. किराडपुरा), सय्यद फैजल सय्यद खलील ( वय २८, रोजेबाग), परवेज खान मुजम्मील खान ( वय २९, रा. जुना बायजीपुरा), अब्दुल हादी अब्दुल रऊफ ( वय ३२, रा. रहेमान गंज) आणि शेख नासेर शेख साबेर ( वय ३७, रा. बायजीपुरा) अशी आरोपींची नावे आहेत. तपास यंत्रणांनी केलेल्या कारवाईत आरोपींचे मोबाईल, लॅपटॉप, हार्ड डिस्क जप्त करण्यात आले होते. त्यातून एटीएसला महत्त्वाच्या बाबी समजल्या आहेत.

हे ही वाचा:

Dasara Melava : दसरा मेळाव्याची जोरदार तयारी; ठाकरे गटाकडून दादर, वरळी परिसरात बॅनरबाजी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss