spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

बॉलिवूड चित्रपटात झळकणार मराठी अभिनेता

शमशेरा या चित्रपटाच्या ट्रेलर ने प्रेक्षकांना पार हादरवून सोडलं आहे. पण संजय दत्त आणि रणबीरचा लुक बघून चाहते चकित झाले आहेत.

रणबीर कपूरच्या ‘ब्रम्हास्त्र’ आणि ‘शमशेरा’ या चित्रपटांची चर्चा भरपूर रंगत आहे. या दोन्ही चित्रपटात रणबीर कपूर प्रमुख भूमिकेत आहे. शमशेरा या चित्रपटाच्या ट्रेलर ने प्रेक्षकांना पार हादरवून सोडलं आहे. पण संजय दत्त आणि रणबीरचा लुक बघून चाहते चकित झाले आहेत. रणबीर कपूर,अभिनेत्री वाणी कपूर आणि संजय दत्त यांच्या ‘शमशेरा’ या चित्रपटाचा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण यातील एक अभिमानाची आणि आनंदाची बातमी म्हणजे एका मराठी अभिनेत्याने या चित्रपटात महत्वाची भूमिका पार पाडली आहे. तो कलाकार सध्या एका प्रसिद्ध मालिकेत आहे.

स्टार प्रवाह वरील सर्वाधिक गाजलेली मालिका म्हणजे ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’. त्यातील दादा म्हणजे अभिनेते सुनील गोडसे. आजवर त्यांनी अनेक मालिका, नाटक आणि चित्रपट केले आहे. आता ते थेट रणबीरच्या ‘शमशेरा’मध्ये दिसणार आहेत. सुनिल गोडसे बॉलिवूड चित्रपटात दिसणार असल्यानं त्यांच्या चाहत्यांमध्ये एक वेगळा उत्साह पहायला मिळत आहे.सुनील गोडसे यांनी मराठीसोबतच हिंदी मालिका आणि चित्रपटातंही त्यांनी काम केले आहे.

बॉलिवूड सेलिब्रिटींची स्टार कास्ट असलेल्या ‘शमशेरा’मध्ये एक मराठमोळा अभिनेता आपल्या भेटीला येणार असल्याने मराठी प्रेक्षक भलतेच आनंदी झाले आहे. हा चित्रपट हिंदी बरोबरच तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये देखील रिलीज होणार आहे.सुनील गोडसे हे शमशेरा चित्रपटात नेमकी कोणती भूमिका साकारणार आहे हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. चित्रपटातील त्यांची भूमिका कशी असणार याकडे आता प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

Latest Posts

Don't Miss