spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Uddhav thackeray : ‘मर्द असतो तो याच लढाईची वाट बघतो’; शिवसेनेकडून दसरा मेळाव्याचा आणखी एक टीझर लॉन्च

शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर दसरा मेळाव्यावरून राज्यात बरंच राजकारण झालं. अखेर शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे यांना उच्च न्यायालयाकडून परवानगी देण्यात आली. आता शिवसेनेनं दसरा मेळाव्याचा आणखी एक टीजर शेअर केला असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिक आणि शिवसेना प्रेमींना दसरा मेळाव्याला उपस्थित राहण्याचं आवाहन केलं आहे. तसंच शिंदे गटाला आव्हानही दिलं आहे. हा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर काही मिनिटातच त्याला तुफान प्रतिसाद मिळाला आहे.

हेही वाचा : 

Navaratri 2022 : अवयवदानाची जनजागृती करत ताडदेवच्या अंबेमातेने दिला भक्तांना आशीर्वाद

उद्धव ठाकरेंच्या भाषणातील काही भाग कट करून हा टिझर बनवण्यात आला आहे. यात उद्धव ठाकरेंनी म्हटले, ‘एक तर कुणाच्या पाठीत वार करायचा नाही, कुणी पाठीत वार केला तर त्याचा कोथळा बाहेर काढल्याशिवाय रहायचं नाही.’एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेतील बडे नेते आणि अनेक पदाधिकारीसुद्धा शिंदे गटात गेले. याच्याच संदर्भाने टीजरमध्ये म्हटलंय की, ‘माझ्या हातात काय आहे, अधिकार म्हणून काहीच नाहीय पण तुमच्या सगळ्यांच्या आशिर्वादाने मिळालेली शक्ती आहे. तीच शक्ती घेऊन मी पुढे चाललोय, लढायला चाललोय.”

गोव्यातून विना परवाना एक बाटली दारु आणली तरी थेट मोक्का – शंभूराज देसाई

‘ही तीच शिवसेना आहे बघा गच्च भरलेली आहे. सगळे एकत्र येऊन शिवसेनेवर तुटून पडणार आहेत. हे ठाकरे कुटुंब आहे संपवा, हे माझं ठाकरे कुटुंब आहे. या प्रत्येकाच्या हृदयात शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आहेत. सगळे एकत्र येऊन शिवसेनेवर तुटुन पडणार आहेत. मर्द असतो तो याच लढाईची वाट बघतो आणि आम्ही त्याच लढाईची वाट बघतोय असं आव्हान उद्धव ठाकरेंनी दिलं आहे.

उद्धव ठाकरे यांनीदेखील हा व्हिडीओ शेअर केला आहे. एक नेता, एक झेंडा, एक मैदान… शिवसेनेच्या पारंपरिक दसरा मेळाव्याचे साक्षीदार व्हा, शिवाजी पार्क दादर येथे, असे ट्विट शिवसेनेच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन करण्यात आले आहे. त्यानंतर, उद्धव ठाकरे यांनीही हा टिझर शेअर करत शिवसैनिकांना आवाहन केलं आहे.

Iranian Passenger Jet : इराणहून चीनकडे जाणाऱ्या विमानात बॉम्ब ठेवल्याचा अलर्ट, एजन्सी सतर्क

Latest Posts

Don't Miss