spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

राष्ट्रवादीने मेळाव्यासाठी ताकद लावली तर मैदानात जागा पुरणार नाही : रोहित पवार

शिवसेनेत फूट पढल्यानंतर खरी शिवसेना कोणाची यावर मोठा वाद दोनी गटामध्ये दिसून येत आहे.येत्या ५ ऑक्टोबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुंबईतील बीकेसी मैदानावर तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दादरच्या शिवाजी पार्कवर दसरा मेळावा पार पडणार आहे. हा दसरा मेळावा दोन्ही गटांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. दोन्ही गटाचे नेते कामाला लागले आहेत. दोन्ही गटांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन केलं जाणार आहे. याच दरम्यान, भाजपकडून शिवसेनेवर आरोप केले जात आहेत की, शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मदत मिळत असल्याचा दावा भाजपने केलाय. भाजपने केलेला हा दावा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी फेटाळला आहे. राष्ट्रवादीने मेळाव्यासाठी ताकद लावली तर मैदानात जागा पुरणार नाही. पण राष्ट्रवादीला ताकद लावण्याची गरजच काय? असा प्रश्नही रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.

रोहित पवार म्हणाले कि मी दोघांच्याही दसरा मेळाव्याला शुभेच्छा आहेत. दोघांचाही मेळावा मोठा व्हावा. मात्र ५ तारखे नंतर लोकांच्या हिताची कामेही व्हायला हवीत. लोकांचे प्रश्न सुटावीत अशी आशा नागरिक म्हणून मी व्यक्त करतो.

शिंदे गटाच्या मेळाव्याला बसेसमधून लोकं आणली जातीलही, पण शिवतिर्थावर होणाऱ्या मेळाव्यात स्वत:हून लोक येतील. शिवसेनेच्या मेळाव्यासाठी राष्ट्रवादीने ताकद लावली तर मैदानात जागाही पुरणार नाही. पण शिवसेनेचीच ताकद एवढी आहे की, त्यांच्या कार्यकर्त्यांमुळेच मैदानात जागा पुरणार नाही. स्वतःच्या हिंमतीवर ते ताकद लावून मेळावा घेत असतील तर राष्ट्रवादीला ताकद लावण्याची काय गरज? रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलतांना असा प्रश्नही केला आहे.

हे ही वाचा:

एकनाथ शिंदे धमकी प्रकरणावर यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया; सहानुभूती मिळवण्यासाठी….

Uddhav thackeray : ‘मर्द असतो तो याच लढाईची वाट बघतो’; शिवसेनेकडून दसरा मेळाव्याचा आणखी एक टीझर लॉन्च

 

Follow Us

Latest Posts

Don't Miss