spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अभिनेता सुबोध भावे चा नवा चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

वाई येथे सुबोधच्या नव्या सिनेमाचं शुटींग सुरू आहे.वाई हे सुबोधचं आवडतं गाव असल्याचं सांगत तिथे शुटींग करण्याचा आनंद त्यानं व्यक्त केला होता.

मराठी सृष्टीतील अनेक उत्तम भूमिका साकारणारा अभिनेता म्हणजे सुबोध भावे. सुबोधनं यापूर्वी बालगंधर्व, लोकमान्य टिळक आणि डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या चरित्र भूमिका साकारल्या आहेत. अभिनयासोबतच त्याने दिग्दर्शनातही पाऊल ठेवले. बरेच दिवस प्रेक्षक सुबोधच्या चित्रपटाची वाट पाहत होते. वाई येथे सुबोधच्या नव्या सिनेमाचं शुटींग सुरू आहे. वाई हे सुबोधचं आवडतं गाव असल्याचं सांगत तिथे शुटींग करण्याचा आनंद त्यानं व्यक्त केला होता. सिनेमाचं नाव मात्र सुबोधनं गुलदस्त्यात ठेवलं होतं. मात्र आज अखेर सुबोधनं स्वत: पोस्ट शेअर करत नव्या सिनेमाच्या नावाची घोषणा केली आहे.

सुबोध भावे दिग्दर्शित ‘मारवा’ हा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मनातलं गूज, डोळ्यांतलं पाणी, अबोलीच्या वाटेवर, चाफ्याची निशाणी, भेटींचे तराणे, चुकामुकींची विराणी “मारवा” एक हुरहूर लावणारी कहाणी’, असं म्हणत सुबोधनं त्याच्या नव्या सिनेमाचं नाव सांगितलं आहे. सिनेमाच्या नावाची घोषणा करताना सिनेमातील अभिनेत्रीलाही सुबोधनं सर्वांसमोर आणलं आहे. अभिनेत्री सायली संजीव ‘मारवा’ या नव्या सिनेमात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. मारवा या सिनेमाची कथा वैभव जोशी यांनी लिहिली आहे तर नितीन प्रकाश वैद्य यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे. सुबोध भावेनं अनेक महिने या सिनेमाच्या संहितेवर काम केलं आहे. दिग्दर्शक म्हणून सुबोधचा हा वेगळा प्रयत्न मारवाच्या निमित्तानं प्रेक्षकांसमोर येणार आहे.

Latest Posts

Don't Miss