spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

कोण आहे पंजाबी सिंगर अल्फाझ सिंह? ज्याच्यावर काल रात्री करण्यात आला हमला

हल्ल्यानंतर जखमी झालेल्या गायक अल्फाजची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

पंजाबी गायक अल्फाजवर प्राणघातक हल्ला झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी हल्लेखोर विक्कीला ताब्यात घेतले आहे. आरोपी विक्कीला हरियाणातील पंचकुला येथून अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, किरकोळ कारणावरून गदारोळ झाला आणि विकी नावाच्या व्यक्तीने पंजाबी गायकाला मारहाण केली. हल्ल्यानंतर जखमी झालेल्या गायक अल्फाजची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

जखमी पंजाबी गायकाला मोहालीतील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. बॉलिवूड गायक आणि रॅपर हनी सिंगने पंजाबी गायक अल्फाजचा फोटो शेअर करून याबाबत माहिती दिली.

सुप्रसिद्ध गायक हनी सिंगने सोशल मीडियावर फोटो शेअर करताना लिहिले की, सिंगर अल्फाजला हॉस्पिटलच्या बेडवर पाहू शकतो. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. अल्फाजची प्रकृती चिंताजनक असल्याचेही त्यांनी सांगितले. ज्याने कोणी माझा भाऊ अल्फाजवर हल्ला केला आहे, त्याला मी सोडणार नाही, असा इशाराही हनी सिंगने दिला आहे. अल्फाजसाठी प्रार्थना करण्याचे आवाहनही त्यांनी लोकांना केले.

गायक अल्फाज पंजाबमध्ये खूप प्रसिद्ध आहे. एक अभिनेता आणि मॉडेल तसेच लेखक म्हणून त्यांची ओळख आहे. अल्फाजचा जन्म चंदीगडमध्ये झाला असून त्याचे मूळ नाव अनंतज्योत सिंग पन्नू आहे. २०११ मध्ये त्याने ‘हाय मेरा दिल’ या पंजाबी गाण्यातून पदार्पण केले. पंजाबी गायक अल्फाजनेही काही चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याने लवकर बरे व्हावे यासाठी अनेक कलाकार आणि चाहते त्याच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहेत.

हे ही वाचा:

Adipurush : आदिपुरुष चित्रपटाचा ट्रेलर #DisappointingAdipurish म्हणून सोशल मीडियावर चर्चेत

Bigg Boss Marathi 4  : मराठी बिग बॉसच्या घरात मुख्यमंत्री शिंदेंच्या नावाची हवा, महेश मांजरेकरांचं मोठे वक्तव्य

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss