spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

१०८MP कॅमेरा आणि ६GB RAM सह Moto G72 झाला भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

दमदार कामगिरीसाठी, मोटोने या स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G99 चिपसेट वापरला आहे. किंमतीनुसार हा एक चांगला चिपसेट आहे.

Motorola ने आज भारतात आपला बजेट सेगमेंट G72 स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनची किंमत २०,००० रुपयांपेक्षा कमी ठेवण्यात आली आहे आणि हा फोन मुख्यतः बजेट खरेदीदारांना लक्षात घेऊन लॉन्च करण्यात आला आहे. हा एक 4G स्मार्टफोन आहे आणि जर तुम्ही बजेटमध्ये चांगला 4G स्मार्टफोन शोधत असाल तर तुम्ही हा स्मार्टफोन चेकआउट करू शकता. या स्मार्टफोनमध्ये १०८MP कॅमेरा, ६GB रॅम आणि १२०Hz फास्ट रिफ्रेश रेट सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

Moto G72 स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचं झालं तर, यात ६.५-इंचाचा फुल HD + POLED डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले १२०Hz फास्ट रिफ्रेश रेटला देखील सपोर्ट करतो. दमदार कामगिरीसाठी, मोटोने या स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G99 चिपसेट वापरला आहे. किंमतीनुसार हा एक चांगला चिपसेट आहे. या चिपसेटबद्दल बोलायचं झालं तर हा चिपसेट जास्त जड कामे हाताळण्यास सक्षम नसून तुम्ही सर्व दैनंदिन कामे सहजपणे हाताळण्यास सक्षम असाल.

स्टोरेजबद्दल बोलायचे झाले तर कंपनीने या स्मार्टफोनमध्ये ६GB रॅम आणि १२८GB इंटरनल स्टोरेज सपोर्ट केले आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड १२ च्या सपोर्टसह येतो. Moto G72 च्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. त्याचा प्राथमिक कॅमेरा १०८MP आहे, अल्ट्रा वाइड कॅमेरा ८MP आहे आणि मॅक्रो कॅमेरा २MP आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी समोर १६MP कॅमेरा उपलब्ध आहे. हा नवीन Moto स्मार्टफोन ५,०००mAh बॅटरीसह येतो आणि ३३W फास्ट चार्जिंगला देखील सपोर्ट करतो.

Motorola ने हा स्मार्टफोन एकाच व्हेरिअंटमध्ये लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनची किंमत १८,९९९ रुपये असली तरी सुरुवातीच्या सेलदरम्यान हा स्मार्टफोन केवळ १५,९९९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल. १२ ऑक्टोबरपासून फ्लिपकार्टवर Moto G72 ची विक्री सुरू होणार आहे. Moto G72 पोलर ब्लू आणि मेटोराइट ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये लॉन्च करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

जाणून घ्या, सुझलॉन, आरआयएल, ओएनजीसी, गॅस, एअरटेल, एचएफसीएल, अदानी एंटरप्राइजेस यांच्या स्टॉक्सबाबत

Medicine : औषध खरे की बनावट? ग्राहकांना QR कोड स्कॅन करून मिळणार माहिती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss