spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

दांडिया खेळताना तरुणाचा हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू, धक्क्याने वडिलांनीही सोडले प्राण

सलग दोन वर्षांनी या वर्षी महाराष्ट्र मध्ये नवरात्री उत्सव जल्लोषात साजरा करण्यात येत आहे. सर्वत्र दांडिया आणि गरबा खेळले जात आहे. पण विरार मध्ये दांडिया खेळतांना एक धक्कादायक घटना घडली आहे. विरारमध्ये (Virar ) हृदय पिळवटून टाकणारी एक घटना घडली आहे. दांडीया (Dandiya ) खेळताना मुलाचा मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूच्या धक्याने पित्याने आपले प्राण सोडले. मनीषकुमार जैन असं मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. तर नरपत जैन असं मुलाच्या मृत्यूच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या पित्याचे नाव आहे. या घटनेनंतर सगळीकडून हलहल व्यक्त होत आहे.

दांडिया खेळत असाताना शनिवार रात्री ३५ वर्षीय मनीषकुमार जैन या तरुणाचा हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू झाला. डोळ्यादेखत मुलाचा मृत्यू झाल्याने त्याच्या वडिलांनाही हृदयविकाराचा झटका आला आणि पिता पुत्रांचे रुग्णालयातच निधन झालं. विरार पश्चिमेच्या ग्लोबल सिटी येथील एव्हरशाईन अवेन्यू या इमारतीमध्ये नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आलं होतं. शनिवारी रात्री दांडिया सुरू असताना मनीषकुमार जैन या तरुणाला हृदयविकाराचा झटका आला. त्याचे वडील नरपत जैन यांनी नागरिकांच्या मदतीने त्याला रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन गेले. मात्र रिक्षामध्येच मनीषकुमारचा मृत्यू झाला. मुलाचा मृत्यू झाल्याचे बघताच त्याचे वडील नरपत जैन यांनाही हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचाही मृत्यू झाला. या प्रकरणी अर्नाळा सागरी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जैन कुटुंबियांचा सोन्याचे दागिने खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. मयत मनीष जैन ज्याचे तीन महिन्यापूर्वीच लग्न झाले होते. मनिष वडिलांच्या व्यवसायात मदत करत होता. नरपत जैन यांच विरार जैन समाजामध्ये चांगल प्रस्थ होतं. तसेच सोसायटीमध्ये देखील दोघांचही वागणं मनमिळाऊ होतं. त्यामुळे दोघांच्या मृत्यूने सोसायटीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. बुलढाण्यात देखील अशीच एक घटना घडली आहे. दांडिया खेळत असताना एकाचा मृत्यू झालाय.

हे ही वाचा:

‘स्वालबार्ड’ एक असं बेट जेथे मरण्यास आहे मनाई…

इम्तियाज जलील एमआयएमचे आहेत, पण भाजपाचे वाटत आहेत- रावसाहेब दानवे

Follow Us

Latest Posts

Don't Miss