spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

JoSAA काउन्सिल २०२२ फेरी ३ जागा वाटपाचा निकाल झाला जाहीर, जाणून घ्या कसा तपासायचा निकाल

संयुक्त जागा वाटप प्राधिकरण (Joint Seat Allocation Authority), JoSAA काउन्सिलिंग २०२२ फेरी 3 जागा वाटप घोषित करण्यात आले आहे.

संयुक्त जागा वाटप प्राधिकरण (Joint Seat Allocation Authority), JoSAA काउन्सिलिंग २०२२ फेरी 3 जागा वाटप घोषित करण्यात आले आहे. ज्या उमेदवारांनी IIT, NIT+ मध्ये प्रवेशासाठी JoSAA २०२२ काउन्सिलिंगसाठी अर्ज केला आहे ते आता अधिकृत वेबसाइट –josaa.nic.in वर त्यांचा तिसर्‍या फेरीचा निकाल पाहू शकतात.

आर्किटेक्चर अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट रिलीज झाल्यानंतर १२ सप्टेंबर २०२२ रोजी JoSAA काउन्सिलिंगसाठी नोंदणी सुरू झाली आणि चाचणी उत्तीर्ण झालेले उमेदवार JoSAA काउन्सिलिंगसाठी पात्र ठरले.

JoSAA 2022 काउन्सिलिंग फेरी 3 वेळापत्रक: कसे तपासायचे?

  1. josaa.nic.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
  2. होमपेजवर ‘ सीट अलोटमेंट रिझल्ट – राऊंड ३’ लिंकवर क्लिक करा.
  3. जेईई मेन ऍप्लिकेशन नंबर आणि पासवर्डसह लॉग इन करा.
  4. JoSAA फेज ३ जागा वाटप निकालावर क्लिक करा आणि एंटर दाबा.

JoSAA 2022: आवश्यक कागदपत्रांची चेकलिस्ट

  • तात्पुरते JoSAA सीट अलोटमेंट लेटर २०२२
  • पासपोर्ट आकाराचे दोन फोटो
  • कँडिडीत अंडरटेकिंग
  • फोटो ओळखपत्र (वैध)
  • ओरिजनल जेईई ॲडवान्स ॲडमीट कार्ड २०२२
  • ई-चलान किंवा एसबीआय नेट बँकिंगद्वारे सीट स्वीकृती शुल्क भरल्याचा पुरावा
  • जन्मतारीख पुरावा (दहावी इयत्ता मार्कशीट)
  • इयत्ता १२ वी (किंवा समतुल्य) मार्कशीट आणि उत्तीर्ण प्रमाणपत्र
  • वैद्यकीय प्रमाणपत्र
  • कॅटेगरी प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • PwD साठी प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट (परदेशी नागरिकांसाठी) किंवा OCI प्रमाणपत्र किंवा PIO कार्ड (लागू असल्यास)
  • डीएस प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • जागा वाटपासाठी नोंदणी सह लॉक केलेले पर्याय

फेरी १ चा निकाल २३ सप्टेंबर २०२२ रोजी जाहीर करण्यात आला, तर फेरी २ चा निकाल २८ सप्टेंबर २०२२ रोजी जाहीर करण्यात आला. जे उमेदवार ३ऱ्या फेरीत गेले आहेत त्यांनी ६ ऑक्टोबर २०२२ संध्याकाळी ५ वाजेपासून ते ७ ऑक्टोबर २०२२ संध्याकाळी ५ वाजेपर्यंत प्रश्नांना उत्तरे देणे ऑनलाईन रिपोर्टिंग, फी भरणे आवश्यक आहे.

हे ही वाचा:

दांडिया खेळताना तरुणाचा हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू, धक्क्याने वडिलांनीही सोडले प्राण

‘स्वालबार्ड’ एक असं बेट जेथे मरण्यास आहे मनाई…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss