spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

लिस्ट ठेवा तयार कारण लवकरच सुरू होतोय Flipckart चा दसरा स्पेशल सेल

Flipkart च्या बिग दसरा सेल २०२२ मध्ये लॅपटॉप, वेबकॅम, वेअरेबल, स्पीकर, हेडफोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक्सवर मोठ्या सवलती मिळतील.

वॉलमार्टच्या मालकीच्या फ्लिपकार्टने बिग दसरा सेल २०३२ च्या तारखा जाहीर केल्या आहेत. Flipkart पुढील मोठ्या सणासुदीच्या हंगामाची विक्री ५ ऑक्टोबरपासून सुरू करेल आणि ८ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहील. मोबाईलवरून खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी कंपनीने अनेक ऑफर्स आणल्या आहेत. तुम्‍हीही गेल्या महिन्‍याच्‍या फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलला मुकला असाल, तर ही संधी तुमच्यासाठीच आहे. यावेळी HDFC तर्फे ग्राहकांना अतिरिक्त १० टक्के सूट दिली जाईल. याशिवाय आणखीही अनेक आकर्षक ऑफर्स आहेत, ज्यांचा लाभ ग्राहकांना घेता येईल.

फ्लिपकार्ट बिग दसरा सेल २०२२ ५ ऑक्टोबरपासून सुरू होईल आणि ८ ऑक्टोबरपर्यंत चालेल . फ्लिपकार्ट प्लस सदस्यांसाठी सणासुदीचा सेल ४ ऑक्टोबरपासून सुरू होईल. फ्लिपकार्ट बिग दसरा सेल २०२२ मध्ये अनेक प्रकारच्या ऑफर अपेक्षित आहेत. मात्र, कंपनी सध्या मोबाईल वापरकर्त्यांना अधिक सूट देत आहे. Flipkart इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर ८० टक्क्यांपर्यंत सूट देत आहे. सेल दरम्यान, टीव्ही आणि घरगुती उपकरणे ७५ टक्क्यांपर्यंत सवलतीत विकली जातील. एवढेच नाही तर फ्लिपकार्टच्या सेलमध्ये Realme, Poco, Samsung, Oppo, Vivo, Apple, Xiaomi आणि Motorola सारख्या स्मार्टफोन्सवरही सूट देण्यात येणार आहे. ज्यांना त्यांचा मोबाईल अपग्रेड करायचा आहे त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे कारण या सेलमध्ये एक्सचेंज ऑफर आणि विनाखर्च EMI पेमेंट पर्याय देखील उपलब्ध आहेत.

जर तुम्हाला फ्लिपकार्ट बाय नाऊ आणि पे लेटर ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही ५०० रुपयांच्या गिफ्ट व्हाउचरसाठी देखील पात्र असाल. Flipkart निवडक मोबाइल फोनसह मोबाइल संरक्षण योजना ऑफर करेल. मात्र, कंपनी लवकरच किंमतीही जाहीर करणार आहे. ज्यांना इलेक्ट्रॉनिक उपकरणं खरेदी करायची आहेत त्यांच्यासाठी हा सेल अधिक चांगला ठरणार आहे. Flipkart च्या बिग दसरा सेल २०२२ मध्ये लॅपटॉप, वेबकॅम, वेअरेबल, स्पीकर, हेडफोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक्सवर मोठ्या सवलती मिळतील. फ्लिपकार्टच्या टीझर पेजवर सेल दरम्यान टॅबलेटवर ५० टक्के सूट देण्यात आली आहे. फ्लिपकार्ट सेलमध्ये प्रिंटर, मॉनिटर्स, प्रोजेक्टर आणि इतर अॅक्सेसरीजवरही भरघोस सूट मिळू शकते.

हे ही वाचा:

JoSAA काउन्सिल २०२२ फेरी ३ जागा वाटपाचा निकाल झाला जाहीर, जाणून घ्या कसा तपासायचा निकाल

Video Viral : टिकटॉक स्टार महिला कंडक्टर निलंबित,ऑन ड्युटी रिल्स पडलं महागात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss