spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

विगन जीवनशैली म्हणजे काय आणि त्याचे फायदे कोणते?

मॅकडोनल्डसारख्या मोठ्या फूड ब्रँडनेदेखील 'मॅकविगन बर्गर' बाजारात आणले आहेत. यानंतर स्टारबक्सने देखील आपल्या मेन्यूमध्ये विगन पदार्थांचा समावेश केला आहे.

‘विगन लाईफस्टाईल’ म्हणजे कुठल्याही प्राण्यावर कुठल्याच प्रकारचा अत्याचार न करणे. विगन आहारात मांस, मासे, दुग्धजन्य पदार्थ (डेअरी प्रॉडक्ट्स), अंडी वर्ज्य असतात. इतकंच काय या आहारात मधमाशांपासून मिळणारं मधही वर्ज्य असतं.

मात्र, विगन जीवनशैलीचा एवढा मर्यादित अर्थ अपेक्षित नाही. यात चामड्यापासून तयार करण्यात आलेल्या वस्तू, लोकर आणि मोतीसुद्धा वापरत नाहीत.

अशाप्रकारची विगन जीवनशैली सहाजिकच महागडी आहे. असं असलं तरी विगन जीवनशैलीवर त्याचा परिणाम होताना दिसत नाही. जगभरात ही लाईफस्टाईल आचरणात आणणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

एकट्या अमेरिकेत स्वतःला विगन म्हणवून घेणाऱ्यांची संख्या २०१४ ते २०१७ या काळात तब्बल ६०० टक्क्यांनी वाढली आहे. ग्लोबल डाटा या संस्थेने ही माहिती दिली आहे. तर विगन सोसायटीने दिलेल्या माहितीनुसार युकेमध्ये गेल्या दशकभरात विगन लोकांची संख्या ४०० टक्क्यांनी वाढली आहे.

मूठभर लोकांपासून सुरू झालेली ही विगन चळवळ आज मुख्य प्रवाहात पोहोचली आहे. त्यामुळेच मॅकडोनल्डसारख्या मोठ्या फूड ब्रँडनेदेखील ‘मॅकविगन बर्गर’ बाजारात आणले आहेत. यानंतर स्टारबक्सने देखील आपल्या मेन्यूमध्ये विगन पदार्थांचा समावेश केला आहे.१ नोव्हेंबर हा दिवस ‘जागतिक विगन दिन’ म्हणून पाळला जातो.

विगन जीवनशैलीचे नेमके फायदे काय?

  • या आहारामध्ये अँटिऑक्सिडंट्स समृद्ध अन्न समाविष्ट आहे, जे जुनाट आजार होण्यापासून प्रतिबंधित करते. तसेच रक्तदाब आणि मधुमेहासारख्या आजारांपासूनही संरक्षण मिळते.
  • त्यात कोलेस्ट्रॉल अजिबात नसते आणि सॅच्युरेटेड फॅट्स देखील खूप कमी असतात. हे मोठ्या समस्यांचा धोका कमी करते आणि तुमचे हृदय आणि शरीर निरोगी ठेवते.
  • या आहारामुळे जनावरांचे प्राणही वाचतात.

  • हे पर्यावरणाचे संरक्षण करण्यास देखील मदत करते आणि तुमचे कार्बन फूटप्रिंट देखील कमी करते.
  • यामुळे तुमचा आहार आणि तुमच्या जेवणावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.
  • शाकाहारी आहार तुमच्या कॅलरीजचे प्रमाण कमी करून आणि तुमच्या प्रथिनांचे सेवन वाढवून अधिक वजन कमी करण्यास मदत करतो.

हे ही वाचा:

फळांवर मीठ आणि साखर घालून खाताय? तर आरोग्यासाठी हानिकारक

दातदुखी पासून सुटका हवी आहे ?तर करा हे घरगुती उपाय

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss