Saturday, September 28, 2024

Latest Posts

राशी भविष्य – ४ ऑक्टोबर २०२२ – राजकीय क्षेत्रात पदभार…

मनोधैर्य वाढवणारा काळ आहे, ठोस निर्णय घ्याल . कोणत्याही विषयावर आग्रही भूमिका मांडाल. राजकीय क्षेत्रात प्रतिष्ठा वाढवणारा काळ आहे.

मेष : मनोधैर्य वाढवणारा काळ आहे, ठोस निर्णय घ्याल . कोणत्याही विषयावर आग्रही भूमिका मांडाल. राजकीय क्षेत्रात प्रतिष्ठा वाढवणारा काळ आहे. कलाकौशल्याला वाव मिळेल. मध्यस्थीतून आर्थिक उत्पन्न वाढेल . दिलासादायक वातावरण तयार होईल. आरोपांनी व्यतीत व्हाल.

वृषभ : दिवसाची सुरुवात अनिश्चित वातावरणात होत आहे. अडचणींवर मात करण्यासाठी समाधानकारक मार्ग निघतील. मनाचे सामर्थ्य वाढवणाऱ्या घटना देखील ऐकायला मिळतील. नवीन संकल्पना सुचून त्याला उचित गती मिळेल. व्यावहारिक गोष्टी व्यवहारातच हलण्याचा प्रयोग करा. सामाजिक सलोखा राखण्यासाठी उचित विचारधारेचा अभ्यास करा.

मिथुन : बराच काळ अडकून पडलेली कामे मार्गी लागतील. वडीलधाऱ्या व्यक्तीकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. काही प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागेल. विनाकारण आरोप लागू शकतात. मानसिक स्थिती साधारण राहील. मध्यस्थीतून बरीच कामे मार्गी लागू शकतील. दुसऱ्याच्या व्यवहारात मध्यस्थी करू नये.

कर्क : समाजकारणात रस वाढेल. राजकीय क्षेत्रात पदभार निश्चित होतील. पर्यटनाचे योग संभवतात. कलागुणांच्या प्रभावाने जनसंपर्क वाढेल. चांगल्या लोकांची मध्यस्थी लाभल्याने फायदा वाढेल. व्यावसायिक भरभराट होईल. खरेदी विक्री करताना काळजी घेण्याची आवश्यकता आहे. कौटुंबिक स्नेह वृद्धिंगत होईल.

सिंह : भाग्योदयाचा काळ आहे. अनेक विषयांत यश प्राप्त होईल. बदलीचे योग संभवतात. कामाचा दर्जा उंचावेल. कौटूंबिक वातावरण आनंदाचे राहील. वडीलधाऱ्या व्यक्तींचा विश्वास संपादन कराल. चांगल्या लोकांचा सहवास लाभेल. यशाच्या शिखराकडे वाटचाल सुरु कराल.

कन्या : मानसिक चलबिचल बनून राहील. वाहन चालवताना काळजी घेणे आवश्यक आहे. खोल पाण्यात जाऊ नये. मनातील उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी केलेल्या विचारांना मूर्त स्वरूप प्राप्त होण्यास मदत होईल. घरच्या मंडळींचे योग्य सहकार्य मिळेल. व्यवसायात विविध संधी प्राप्त होऊ शकतील. अचानक येणाऱ्या खर्चाचे अगोदरच नियोजन करणे आवश्यक आहे.

तुळ : चांगल्या लोकांच्या भेटीगाठी होतील, मित्रपरिवाराच्या सान्निध्यात काळ व्यतीत कराल. भागीदारीसाठी विचारणा होईल त्याबाबत सकरात्मक निर्णय करणे फायद्याचे आहे. भावनाप्रधान होऊन निर्णय घेतल्याने कुठेतरी फसगत होऊ शकते, त्यामुळे काळजी घेण्याची आवश्यकता आहे. कार्यालयातील लोकांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल.

वृश्चिक : आज अनपेक्षित घटनांनी नैराश्य निर्माण होऊ शकेल. हितशत्रूंच्या वर्तनाने त्रस्त व्हाल. त्यातच आरोग्याच्या समस्याही उदभवू शकतील. मित्रपरिवाराकडून सहकार्य मिळेल. भागीदारीत विचलित होऊन कोणतेही निर्णय घेऊ नका. सात्विक लोकांच्या संगतीने बऱ्याच समस्या सुटू शकतील. दत्त उपासना फलदायी ठरेल. स्नेहीजनांच्या भेटीगाठी होतील.

धनु : काही आश्वासन प्राप्त झाल्याने नवीन आशा पल्लवित होतील. प्रवासातून हेतू साध्य होतील . शारीरिक परिश्रमाने थकवा जाणवू शकेल. स्वभावाचा गैर फायदा घेणारे लोक भेटतील. किरकोळ आजाराने मानसिक स्थेर्य ढासळू शकेल. कौटुंबिक पातळीवर निर्णय घेताना अडचणींना सामोरे जावे लागेल. मित्र परिवाराचे सहकार्य मिळेल.

मकर : घर खरेदीसाठी हालचाली सुरु कराल. कुटुंबातील व्यक्तींचा संवाद घडवून आणण्यात यशस्वी व्हाल. जवळचे प्रवास घडून येतील. संततीकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. नवीन विषयाच्या अभ्यासासाठी अनुकूल काळ आहे. परदेश गमन योग्य संभवतो. संतती विषयक प्रश्न मार्गी लागतील. गुप्तविकारानी त्रस्त व्हाल. विद्यार्थ्यांसाठी प्रगतीचा काळ आहे.

कुंभ : नावलौकिक -सन्मान -प्रतिष्ठा मिळवून देणारे दिवस आहेत. सरकार दरबारी पदोन्नती मिळेल. वाहन खरेदीसाठी वातावरण निर्मिती होईल. कुटुंबासाठी अधिक खर्चाची तरतूद करावी लागेल. निसर्गरम्य स्थळाला भेट द्याल. व्यावसायिक स्थितीत बदल संभवतो. स्त्रियांना माहेरच्या नातेवाईकांचा सहवास लाभेल. विद्यार्थ्यांना कला क्षेत्रात अधिक मेहनत घ्यावी लागेल.

मीन : समाजमन ओळखण्याची क्षमता वाढेल. आर्थिक व्यवहार सुरळीत होतील. प्रगतीकडे वाटचाल सुरु होईल. सामाजिक स्थिती चांगली बनून राहील. मानसन्मान मिळेल. प्रापंचिक विषयावर चिंतन मनन करण्याची आवश्यकता वाटते. वाहन खरेदी तूर्तास नको. व्यावसायिक निर्णय घ्यायला उत्तम काळ आहे.

Latest Posts

Don't Miss