spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Prakash Mahajan : मेळाव्यात विचार नाही तर नाटकं पाहायला मिळतील; मनसे प्रवक्ते प्रकाश महाजन

सध्या दसरा मेळाव्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहे. दोन्ही नेत्यांनीकडून दसरा मेळाव्याला गर्दी जमवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान उद्धव ठाकरे यांचा शिवाजी पार्कवर दसरा मिळावा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांची जोरदार तयारी सुरु आहे.

सध्या दसरा मेळाव्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहे. दोन्ही नेत्यांनीकडून दसरा मेळाव्याला गर्दी जमवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान उद्धव ठाकरे यांचा शिवाजी पार्कवर दसरा मिळावा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांची जोरदार तयारी सुरु आहे. तर दुसरीकडं बीकेसी मैदानावर शिंदे गटाकडून जोरदार तयारी करण्यात केली जात आहे. यात आता मनसेने देखील उडी घेतली आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या दसरा मेळाव्यात विचार ऐकायला मिळणार नाहीत तर तिथं नाटकं पाहायला मिळतील असे वादग्रस्त वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते प्रकाश महाजन (Maharashtra Navnirman Sena spokesperson Prakash Mahajan) यांनी केलं आहे.

उद्या (५ ऑक्टोबर) शिंदे गट आणि ठाकरे यांचे वेगवेगळे दसरा मेळावे होणार आहेत. या मेळाव्यावरुन सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यावर मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दसरा मेळाव्यात ठाकरे शिंदे एकमेकांचे कपडे फाडतील. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या अंगावर पडलेले डाग धुवून काढण्याचं काम या मेळाव्यातून होणार असल्याचे महाजन म्हणाले. पूर्वी दसरा मेळाव्यात विचार ऐकण्यासाठी लोक यायचे. मात्र, आता या दोन्ही दसरा मेळाव्यात एकमेकांचं वस्त्रहरण होणार असल्याचे प्रकाश महाजन म्हणाले. तसेच ठाकरे आणि शिंदे यांच्या मेळाव्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यासाठी राष्ट्रवादीने ताकद लावली आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यासाठी भाजपने आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. त्यामुळं हे दसरा मेळावे यशस्वी करण्यासाठी दोन्ही गटांकडून सध्या स्पर्धा सुरु असून, याच मेळाव्यावरून महाराष्ट्रातील राजकारणाची दिशा ठरणार असल्याचे महाजन म्हणाले.

दरम्यान दसरा मेळाव्याला गर्दी जमवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी भावनिक साद घातली आहे. तर एकनाथ शिंदे यांच्याकडून सत्तेचा वापर करण्यात येत असल्याचे प्रकाश महाजन म्हणाले. बाळासाहेबांवरची निष्ठा दाखवण्यासाठी शिवसैनिकांना शिवतीर्थावर यावं लागेल असं आव्हान उद्धव ठाकरे करत आहेत. तर एकनाथ शिंदे सत्तेचा वापर करुन लोक जमवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे महाजन यावेळी म्हणाले.

हे ही वाचा:

Bigg Boss Marathi 4 : ‘आटली बाटली फुटली’; चौथ्या पर्वातलं पहिलं वहिलं नॉमिनेशन कार्य

‘तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो’ म्हणण्याचा अधिकार उरला नाही’; मनसैनिकाचे ठाकरेंना पत्र

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss